JOIN US
मराठी बातम्या / देश / Delhi assembly election : भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Delhi assembly election : भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील उमेदवाराचे नाव भाजपने अद्याप जाहीर केलेले नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये तब्बल 57 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. फेब्रुवारीच्या 8 तारखेला दिल्लीची विधानसभा निवडणूक होणार आहे. यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. विद्यमान आमदार विजेंद्र गुप्ता, रवींद्र गुप्ता आणि योगेश चंडोलिया या दोन माजी महापौरांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबरोबरच उमेदवारांच्या यादीत आपचे माजी आमदार कपिल मिश्रा आणि आणखी 15 उमेदवारांची नावे आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील उमेदवाराचे नाव भाजपने अद्याप जाहीर केलेले नाही. 70 जागांसाठी 13,750 मतदान केंद्र उभारणार दिल्ली, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश या राज्यांमधील निवडणुका सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने राजकीय पक्ष या राज्यांमध्ये आपली सत्ता यावी यासाठी पुरेपुर प्रयत्न करतात. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी तब्बल 13,750 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी 90 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांना मतदान केंद्रावर येणं शक्य नसेल अशा ज्येष्ठ व्यक्तींसाठी पोस्टाने मतदान करता येणे शक्य आहे. मात्र यासाठी पाच दिवसांपूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे. 22 फेब्रुवारी रोजी दिल्ली विद्यमान विधानसभा होणार बरखास्त दिल्लीची विद्यमान विधानसभा 22 फेब्रुवारी रोजी बरखास्त होणार आहे. 14 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज कृभरण्याची सुरुवात झाली आहे. तर 21 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 12 जागा या आरक्षित असून 58 खुल्या वर्गातील आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या