JOIN US
मराठी बातम्या / देश / 'या' वर्षापासून अयोध्येतील राम मंदिर सर्वांसाठी होणार खुले, लवकरच पूर्ण होणार पाया भरणी

'या' वर्षापासून अयोध्येतील राम मंदिर सर्वांसाठी होणार खुले, लवकरच पूर्ण होणार पाया भरणी

येत्या दोनच वर्षात अयोध्येतील राम मंदिर बांधून पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने असा विश्वास व्यक्त केला आहे की, डिसेंबर 2023 भाविकांना या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेता येईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: अयोध्येत भगवान श्रीरामांचे भव्य मंदिर (Shri Ram Mandir in Ayodhya) निर्माणाधीन आहे. दरम्यान या मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होणार आणि अयोध्येत जाऊन दर्शन कधी घेता येणार याबाबत भाविकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येते आहे. येत्या दोनच वर्षात अयोध्येतील हे मंदिर बांधून पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने असा विश्वास व्यक्त केला आहे की, डिसेंबर 2023 भाविकांना या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेता येईल. तर या मंदिराचा पाय नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषद (VHP) चे नेता गोपाल यांनी  दिली आहे. अयोध्येत निर्माणाधीन असणारे हे भगवान रामांचे मंदिर 360 फुट लांब, 235 फुट रुंद आणि 161 फुट उंच असणार आहे. या मंदिराला एकूण 5 शिखरं असणार आहे. त्यापैकी सर्वात उंच शिखर 161 फुटांचं असणार आहे. तीन मजल्याचं असणारं हे मंदिर 2023 पर्यंत बांधून पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. झी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. हे वाचा- T20 WC: अफगाणिस्तान हरलं तर काय करणार… रविंद्र जडेजानं दिलं रोखठोक उत्तर पाया भरणीचे काम सुरू प्रभू रामाचं भव्य मंदिर उभारण्यासाठी पायाभरणी झाली आहे आणि आता त्यावर मंदिराचा पाया बांधण्याचं काम सुरू आहे. 40 फूट खोल असा पाय बांधला जात आहे. त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी ग्रेनाइटचा वापर केला जाणार आहे. हे ग्रेनाइट मिर्झापूर आणि बंगळुरूहून आणण्यात येणार आहे. तर याठिकाणी वापरले जाणारे दगड राजस्थानच्या पहाडपूर, जोधपूर, मकरानाहून आणि उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमधून मागवले जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या