JOIN US
मराठी बातम्या / देश / '15 एप्रिलला लॉकडाऊन संपणार पण...' CM ने केलेलं ट्वीट पुन्हा केलं डिलीट

'15 एप्रिलला लॉकडाऊन संपणार पण...' CM ने केलेलं ट्वीट पुन्हा केलं डिलीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांशी चर्चा केली आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.

जाहिरात

Varanasi: People maintain social distance as they stand outside a chemist shop during day-2 of a nationwide lockdown, imposed in the wake of coronavirus pandemic, in Varanasi, Thursday, March 26, 2020. (PTI Photo)(PTI26-03-2020_000098B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 एप्रिल : कोरोनाव्हायरसच्या उद्रेकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांशी चर्चा केली आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू इतर मुख्यमंत्री आणि प्रशासकांसमवेत उपस्थित होते. त्यांनी लॉकडाऊनवर असं काही ट्विट केलं की जे आता चर्चेचा विषय बनलं आहे. मात्र नंतर खंडू यांनी हे ट्विट हटवून दुसर्‍या ट्विटमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधानांसमवेत बैठकीचा व्हिडिओ सामायिक करताना खंडू यांनी लिहिले - ‘लॉकडाउन 15 एप्रिलला पूर्ण होईल पण याचा अर्थ असा नाही की लोक रस्त्यावर फिरून मोकळे होतील. त्यांना त्यांची जबाबदारी आणि सामाजिक काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाशी लढण्याचा हा एकमेव मार्ग आहे.’ खंडू यांच्या या ट्विटवर अनेक कमेंट्स आल्या. यानंतर खंडू यांनी हे ट्विट डिलीट केलं आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण लिहलं. खंडू म्हणाले की, ‘लॉकडाऊन कालावधी लक्षात घेता केलेले ट्विट एका अधिकाऱ्याने केले. ज्याला हिंदी भाषेचे आकलन कमी आहे, त्यामुळे ते ट्विट हटविण्यात आलं आहे.’ कोरोनाव्हायरसचा धोका संपूर्ण देशभरात सतत वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 1958 लोक याचा बळी पडले आहेत. तर भारतात मृतांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM MODI) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. महाराष्ट्र, मिझोरम, दिल्ली, बिहार, तेलंगणा, पुडुचेरी, गोवा, त्रिपुरा, उत्तराखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश या मुख्यमंत्र्यांसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रशासक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींशी चर्चेसाठी उपस्थित होते. या दरम्यान पीएम मोदी म्हणाले की आम्ही संयुक्तपणे कोरोना विषाणूविरूद्ध लढू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या