JOIN US
मराठी बातम्या / देश / झोपडपट्टीत अग्नितांडव; 7 जणांचा होरपळून मृत्यू तर 60 हून अधिक झोपड्या जळून खाक

झोपडपट्टीत अग्नितांडव; 7 जणांचा होरपळून मृत्यू तर 60 हून अधिक झोपड्या जळून खाक

आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. अग्निशमन विभागाने घटनास्थळावरून 7 मृतदेह बाहेर काढले आहेत.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली 12 मार्च : दिल्लीतील गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीत लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे (7 people Died in a Fire that Broke out in Delhi). दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीत आग लागली. यात 7 जणांचा मृत्यू झाला. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. अग्निशमन विभागाने घटनास्थळावरून 7 मृतदेह बाहेर काढले आहेत. मोठी बातमी! काश्मीर खोऱ्यातील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा तर एकाला अटक आग एवढी भीषण होती की तिने 60 हून अधिक झोपडपट्ट्यांना कवेत घेतलं. दिल्ली अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. कूलिंगचं काम अजूनही सुरू आहे. ही घटना गोकुळपुरीच्या 12 क्रमांकाच्या खांबाच्या आसपासची आहे. आग नेमकी कशामुळे लागली याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की उन्हाळ्याला सुरुवात होताच आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याचं चित्र आहे. याआधीही दिल्ली अग्निशमन सेवेने मंगळवारी उत्तर-पश्चिम दिल्लीच्या बवाना येथील प्लास्टिक गोळ्यांच्या कारखान्यात लागलेली आग विझवण्यासाठी इतर संसाधनांसह ड्रोनचा वापर केला. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाने प्रथमच ड्रोनचा वापर केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. निवडणूक निकालांचा एवढा धक्का बसला की, नेत्याने उचललं टोकाचं पाऊल स्थापित कॅमेरे असलेले ड्रोन आग नियंत्रणात आणण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करतात. अग्निशमन विभागाने म्हटलं आहे की त्यांच्याकडे सध्या असे फक्त एक ड्रोन आहे जे मुळात अग्निशामकांना आगीची व्याप्ती आणि व्याप्तीचा अंदाज लावण्यासाठी मार्गदर्शन करते आणि त्यानुसार विशिष्ट दिशेने आग आटोक्यात आणण्यासाठी संसाधने वापरली जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या