JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / मनसे जोरात, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे तर अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर

मनसे जोरात, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे तर अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Raj Thackeray- Amit Thackeray: फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकींसाठी मनसे कामाला लागली आहे. यावेळी मनसेनं आपलं लक्ष पुणे (Pune)आणि नाशिक (Nashik) मध्ये केंद्रित केल्याचं दिसून येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 28 जुलै: फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकींसाठी मनसे कामाला लागली आहे. यावेळी मनसेनं आपलं लक्ष पुणे (Pune)आणि नाशिक (Nashik) मध्ये केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर असून एकाच महिन्यातला हा त्यांचा दुसरा दौरा आहे. तर राज ठाकरे यांनी यापूर्वी नाशिक दौरा केला होता. आता आज अमित ठाकरे (Amit Thackeray) नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांचाही हा दुसरा नाशिक दौरा आहे. अमित ठाकरे हेही यंदाच्या महापालिका निवडणुकीत जास्त रस घेताहेत. मुख्य म्हणजे मुंबईच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल वगळता राज ठाकरे महापालिकेच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसून येत नाही आहे. या नाशिक दौऱ्यात अमित ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार आहेत. मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशीवन टू वन चर्चा करणार आहेत. आढावा घेऊन मनसे अध्यक्षांना अहवाल पाठवणार आहेत. अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महापालिकेची जवाबदारी येण्याची शक्यता आहे. राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल राज ठाकरे पुणे दौऱ्यावर राज ठाकरे आजपासून पुन्हा एकदा तीन दिवसीय पुणे (Pune Visit) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते 42 प्रभागात शाखाध्यक्षांच्या बैठका घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे प्रत्येक शाखाध्यक्षाशी वन टू वन (One to One) बोलणार आहेत. विशेष म्हणजे आजपासून सुरु होणारा पुणे (Pune) दौरा राज ठाकरे यांचा 15 दिवसाच्या आत हा दुसरा तीन दिवसाचा दौरा आहे. गेल्या पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभाग प्रमुख आदींशी चर्चा केली. या दौऱ्यात राज ठाकरे हे स्वतः पक्षाचे पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती (Interview) घेणारेत. या मुलाखती नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात होणार असून थोड्याच वेळात राज ठाकरे कार्यालयात दाखल होणार आहेत. शिल्पा शेट्टीच्या अडचणीत भरच भरच, क्लीन चीट नाहीच आजपासून म्हणजेच 28 जुलै ते 30 जुलै असा तीन दिवसीय दौरा निश्‍चित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान शाखा अध्यक्ष, उप विभाग अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. राज ठाकरेंचा दौरा पुणे मनसेला नवसंजीवनी देणार का? नाशिक (nashik) पाठोपाठ राज ठाकरेंनी पुणे दौरा केला. आगामी पुणे मनपा निवडणुकीच्या (pune municipal corporation election) तयारीसाठी नव्यानं पक्षबांधणीसाठी राज ठाकरे हा पुणे (pune) दौरा करत असल्याचं मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या