JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / 'राहुल गांधी यांना संपवण्याचा कट तर नाही...?' नाना पटोलेंनी व्यक्त केली शंका

'राहुल गांधी यांना संपवण्याचा कट तर नाही...?' नाना पटोलेंनी व्यक्त केली शंका

’ राहुल गांधी यांना संपवण्याचा कट तर नाही ना अशी शंका येते, या प्रकरणाची चौकशी करावी, हल्ला कोणी केला हे स्पष्ट करावे'

जाहिरात

'त्यामुळे राहुल गांधी यांना संपवण्याचा कट तर नाही ना अशी शंका येते, या प्रकरणाची चौकशी करावी, हल्ला कोणी केला हे स्पष्ट करावे'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 10 ऑगस्ट : ‘राहुल गांधी (rahul gandhi) यांनी काश्मीर (kashmir) दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ते अवघ्या 500 मीटर अंतरावर असताना बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे राहुल गांधी यांना संपवण्याचा कट तर नाही ना अशी शंका येते’ असा धक्कादायक खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे.  शहरातील हुतात्मा स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात सहभाग झाले. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. ‘गांधी नावातच एवढा दम आहे की, त्यांना गांधी या नावाची भीती आहे. देशात गांधी नसेल तर आमचं काहीच नाही, असं सुभाषचंद्र बोस आणि नेहरू म्हटलेलं आहे. पण आता गांधी परिवारावर सोशल मीडियावर घाणेरडी टीका केली जात आहे. गांधी परिवारावर जेवढी टीका करता येईल ते करत आहेत. पण, याचाही काही फरक पडणार नाही, असं नाना पटोले म्हणाले. जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa च्या टॉपवर उभी तरुणी; धडकी भरवणारा VIDEO ‘राहुल गांधी यांनी काश्मीर दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी अवघ्या 500 मिटर अंतरावर असताना राहुल गांधी यांच्यासमोर बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे राहुल गांधी यांना संपवण्याचा कट तर नाही ना अशी शंका येते, या प्रकरणाची चौकशी करावी, हल्ला कोणी केला हे स्पष्ट करावे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केला. ‘आज शेतकरी मरत आहेत त्यांची काळजी नाही एकीकडे लोकल चालू  का करत नाही म्हणतात आणि दुसरीकडे आम्हला विचारल्या शिवाय रेल्वे का सुरू करताय विचारता. रेल्वे राज्य मंत्र्यांना अधिकार नाही तरी विचारताय, असं म्हणत नाना पटोले यांनी रावसाहेब दानवे यांना सणसणीत टोला लगावला. ‘इंग्रजांपेक्षा वाईट परिस्थिती मोदी सरकारने आणली आहे. सर्व देश काँग्रेसने उभा केला आणि हे विचारात काँग्रेसने काय केलं. चहा विकता विकता यांनी देश विकण्याचा अधिकार कोणी दिला नाही. मुंबई सारखं शहर वर्षभर बंद ठेवलं आहे, शहर बंद असल्याने काय होते जनतेला विचारा, अयोध्येच्या राममंदिरामध्ये घोटाळे सुरू आहे, रामाच्या नावाने टोल वसूल केला’ अशी टीकाही पटोलेंनी केली. तातडीने मायदेशी परत या, अफगाणिस्तानातील भारतीयांना मोदी सरकारच्या सूचना ‘लस नाही त्यामुळे कोरोना थांबेल की नाही याबाबत काही सांगता येत नाही. आपल्याकडे लस होती तेव्हा पाकिस्तानला फुकट दिली आता आपण विकत घेत आहोत. रेमेडिसिव्हर चा काळाबाजार सुरू असताना विधानसभा आणि विधान परिष चे विरोधी पक्ष नेते हे दोन वीर काळाबाजार करणाऱ्याला वाचण्यासाठी रात्री पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, अशी टीकाही पटोले यांनी केली. बायको परत ये, नवऱ्याने मुलाला तिरडीवर झोपवले अन् मुलीला सांगितले गळफास घ्यायला.. तसंच, काँग्रेसचे विचार राज्यभर पोचविण्यासाठी वर्षभर कार्यक्रम राबविणार आहे. 15 ऑगस्टनंतर व्यर्थ न हो बलिदान बचाऍंगे संविधान हा कार्यक्रम राबविणार आहे, अशीही माहितीही पटोलेंनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या