JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / प्रेमात आंधळी झालेल्या महिलेनं सुखी संसाराचा केला सत्यानाश; Boyfriend साठी पतीला सोडलं पण...

प्रेमात आंधळी झालेल्या महिलेनं सुखी संसाराचा केला सत्यानाश; Boyfriend साठी पतीला सोडलं पण...

Crime in Nagpur: नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका विवाहित महिलेनं प्रियकरासाठी आपल्या सुखी संसाराचा सत्यानाश केला आहे.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 17 नोव्हेंबर: नागपुरातील (Nagpur) वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका विवाहित महिलेनं प्रियकरासाठी आपल्या सुखी संसाराचा सत्यानाश केला आहे. तिने प्रियकाराशी लग्न करता यावं, यासाठी पतीला सोडून दिलं (married woman leave husband for boyfriend). पण ऐनवेळी प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने (Boyfriend refused to marriage) महिलेची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्यानंतर पीडित विवाहितेनं वाठोडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या परिसरातील रहिवासी असणाऱ्या 30 वर्षीय फिर्यादी महिला एका इन्शुरन्स कंपनीत काम करत होती. पीडित महिला विवाहित असून त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा देखील आहे. पण इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना अभय सुरेश जैस्वाल नावाच्या 28 वर्षीय युवकासोबत फिर्यादीची ओळख झाली. कालांतराने दोघांच्या ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही लग्नाचा विचार केला. हेही वाचा- मेव्हणीवर जीव जडला, प्रेमाखातर पत्नीचा काटा काढला पण फिर्यादीचा पती दोघांच्या लग्नात अडसर ठरत होता. त्यामुळे आरोपी अभय याने तिला पतीला सोडून देण्यास सांगितलं. प्रियकराच्या प्रेमात आंधळी झालेल्या महिलेनं कसलाही विचार न करता प्रियकरासाठी आपल्या पतीला टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर पतीपासून विभक्त होऊन आपल्या मुलासोबत एकटी राहू लागली. दरम्यान आरोपीनं वेळोवेळी पीडितेचं लैंगिक शोषण केलं. दिघोरी येथील एका हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. हेही वाचा- काळिमा! नातवाच्या दफनविधीसाठी गेलेल्या नराधमानं पोटच्या लेकीवरच केला बलात्कार पतीला सोडून दिल्यानंतर पीडित महिलेनं प्रियकर अभयकडे लग्नासाठी विचारणा केली. आरोपीनं टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पीडितेनं लग्नासाठी आरोपीवर दबाब टाकूनही तो लग्नासाठी होकार देत नव्हता. यामुळे पीडित महिलेनं वाठोडा पोलीस ठाण्यात जाऊन प्रियकाराविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या