प्रातिनिधीक फोटो
नागपूर, 19 ऑक्टोबर: नागपुरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 12 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या (Minor boy murder) केल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाचा (Immoral Relationship) गावात बोभाटा होऊ नये म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मृत मुलाच्या 17 वर्षीय बहिणीसह तिच्या प्रियकराला अटक (Sister and her boyfriend arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत. सुजल नाशिक रामटेके असं हत्या झालेल्या 12 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो नागपुरजवळील द्रुगधामना येथील रहिवासी आहे. मृत सुजलचे वडील माथाडी कामगार आहेत, तर आई खाजगी नोकरी करते. सोमवारी सुजलचे आई वडील दोघंही कामावर गेले होते. दरम्यान घरी सुजल आणि त्याची सतरा वर्षीय बहीण होती. दुपारी सुजल दुकानात जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. पण दीड तासानंतर तो ‘वाचवा, वाचवा’ असं ओरडत घरी आला, त्यानंतर सुजलच्या बहिणीनं त्याला पाणी प्यायला दिलं. त्यानंतर सुजल निपचित पडला, अशी माहिती सुजलच्या बहिणीने शेजाऱ्यांना दिली. हेही वाचा- अखेर 7 दिवसांनी राजन शिंदेचा मारेकरी सापडला; नेमकं काय घडलं त्या रात्री? यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना देखील बहिणीनं अशीच माहिती दिली. पण मुलीने सांगितलेल्या घटनाक्रमात अनेक विसंगती आढळून आल्या. तसेच मुलाची गळा आवळून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. तसेच घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे बहिणीनेच भावाची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी बहीण आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत कसून चौकशी केली आहे. हेही वाचा- मुंबई: शिर धडावेगळं करून पुरावा केला नष्ट; पण गुडघ्यातील प्लेटमुळे उलगडला थरार यानंतर दोघांच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या आहेत. तसेच घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे अनैतिक संबंधांचा बोभाटा होऊ नये म्हणूनच निरागस सुजलची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी वाडी पोलिसांनी 17 वर्षीय मुलीसह तिच्या प्रियकराला रात्री उशिरा अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.