प्रातिनिधीक फोटो
उज्जैन, 14 नोव्हेंबर: नागपुरातील (Nagpur) एका महिलेची मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) एका दाम्पत्याला परस्पर विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेलं घरकाम देण्याच्या बहाण्यानं आरोपींनी तिची विक्री केली होती. पण मध्य प्रदेशात गेल्यानंतर आरोपी दाम्पत्याने पीडित महिलेला तब्बल 16 महिने घरात डांबून तिच्यावर अत्याचार (detain in home for 16 month and raped) केले आहेत. आरोपीनं तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून गरोदर राहण्यास भाग (Forced to become pregnant) पाडलं आहे. पीडित महिलेनं बाळाला जन्म देताच आरोपींनी तिला रस्त्यावर फेकून देत पळ काढला आहे. यानंतर अत्याचाराची ही भयावह कहाणी समोर आली आहे. पीडित महिला मध्य प्रदेशातील देवास येथे बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर, या धक्कादायक घटनेला वाचा फुटली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी राजपाल सिंह नावाच्या माजी उपसरपंचाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 महिन्यांपूर्वी पीडित महिलेची आरोपी राजपाल सिंह याला विक्री करण्यात आली होती. घरकाम देण्याच्या बहाण्याने आरोपी पीडितेला घेऊन उज्जैन येथे आला होता. हेही वाचा- शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी रचला खुनाचा कट; पण डाव उलटला अन् कुटुंबासह झाली गजाआड उज्जैनला आल्यानंतर आरोपी राजपाल आणि त्याच्या पत्नीने पीडितेला घरातच डांबून ठेवलं होतं. याप्रकरणात मदत करणाऱ्या कृष्णपाल नावाच्या नातेवाईकासह अर्जुन नावाच्या दलालाही पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपासणीसाठी उज्जैन पोलिसांचं एक पथक नागपुरला देखील जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे याप्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. हेही वाचा- Pune: कंपनीत सोबत काम करणाऱ्या तरुणीवर रेप; जेवण बनवण्यासाठी घरी बोलावलं अन्… नेमकं प्रकरण काय आहे? आरोपी राजपाल आणि त्याची पत्नी चंद्रकांता यांना दोन मुलं होती. पण जन्मानंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित दाम्पत्यानं तिसऱ्या मुलासाठी प्रयत्न केला. पण त्यांना मूलबाळ होतं नव्हतं. त्यामुळे त्यांनी नागपुरातील एका महिलेची खरेदी केली. तिला उज्जैन याठिकाणी आणून तिच्यावर जबरदस्तीने अनेकदा अत्याचार केले आहेत. तसेच तिला गरोदर राहण्यास भाग पाडलं आहे. पीडित महिलेनं 26 ऑक्टोबर रोजी बाळाला जन्म दिला. त्यानंतर आरोपींनी 6 नोव्हेंबर रोजी तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून दिलं आहे. या घटनेचा पुढील तपास उज्जैन पोलीस करत आहेत.