JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / शरद पवार-सोनिया-ठाकरे फोनवरच्या चर्चेत काय झाला फायनल निर्णय? कॅबिनेट बैठकीनंतर मोठ्या बातमीचे संकेत

शरद पवार-सोनिया-ठाकरे फोनवरच्या चर्चेत काय झाला फायनल निर्णय? कॅबिनेट बैठकीनंतर मोठ्या बातमीचे संकेत

कॅबिनेट बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : राज्य सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालं असून काही वेळातच कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. ही बैठक मुख्यमंत्र्यांची शेवटची कॅबिनेट बैठक असल्यांचही सांगितलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या बैठकीवर आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा (Phone discussion between Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi) झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतर ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ (Indication of Uddhav Thackeray’s resignation) शकतात, असंही सांगितलं जात आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला होता. यावेळीच ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं होतं. आताच्या तिघांमध्ये झालेल्या फोनवरील संवादात नेमकं काय घडलं, हे कॅबिनेट बैठक संपल्यानंतरच आपल्याला कळू शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी.. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार गोत्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आव्हानापासून ते आवाहनापर्यंतची भाषा वापरून शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट एकनाथ शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. एकनाथ शिंदे गटामध्ये असलेल्या सगळ्याच आमदारांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसबाबतची (NCP) नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या