JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 तारखेला घेणार शपथ

ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 तारखेला घेणार शपथ

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे : कोरोना व्हायरसचे संकट असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय वाद उभा ठाकला होता. अखेर विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्धव ठाकरे बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. हेही वाचा - भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढली, राम शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना टोला विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोहळा सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत. विधान परिषदेवर शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचीही निवड झाली आहे. **हेही वाचा -** एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना सुनावले, भाजपातला कलह चव्हाट्यावर भाजपकडून यावेळी चार सदस्य असणार आहे. भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी तिकीट डावलण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली आहे. डॉक्टर अजित गोपचडे यांनी अर्ज दाखल केला होता परंतु, ऐनवेळी त्यांनी माघारी घेतली त्यामुळे रमेश कराड यांची निवड झाली. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या