भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढली, माजी मंत्र्याने थेट चंद्रकांत पाटलांना लगावला टोला

भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढली, माजी मंत्र्याने थेट चंद्रकांत पाटलांना लगावला टोला

राम शिंदे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत टोला लगावला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मे : विधान परिषदेचं तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या भाजप नेत्यांची यादी आता वाढतच जात आहे. यात आता माजी मंत्री राम शिंदे यांचाही समावेश झाला आहे. राम शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी फेसबुक पोस्टचा आधार घेतला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत टोला लगावला आहे.

पंकजा मुंडेंमुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली, पण त्यांच्यासहित इतरांना मिळाली नाही याची खंत राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे. राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात पराभव केला. पराभवानंतर शिंदे यांनी त्यांच्याच पक्षातील राधाकृष्ण विखे पाटील यांना पराभवासाठी जबाबदार ठरवत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

काय आहे राम शिंदे यांची फेसबुक पोस्ट?

“विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी 'विधानपरिषदेसाठी नेते, इच्छूक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील,' असे म्हटले होते.

त्या अनुषंगाने मा.पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास ( त्यामुळे श्री रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली ) केला. जो मला आणि इतरांना जमला नाही," असं राम शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपमध्ये गृहकलह

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'एकनाथ खडसे यांनी पक्षात मार्गदर्शकाची भूमिका बजवावी' असा सल्लावजा टोला लगावला होता. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर एकनाथ खडसे यांनी भाष्य करत पाटलांना भाजपमधील कामाची आठवण करून दिली.

खडसे म्हणाले की, 'आज चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शकाची भूमिका बजावत असले तरी त्यांच्या अगोदर मीच ती भूमिका बजावत होतो आणि मला सांगितलं तर पुढेही बजावत राहील'.

तसंच, 'पक्षाने मला भरपूर दिले आहे हे नाकारून चालणार नाही. पक्षाने भरपूर दिले आहे मात्र पक्षासाठी आम्हीही खूप खस्ता खाल्या आहेत. आमचं आयुष्य समर्पित केलं आहे याचा ही विचार करायला हवा. पक्षाचे ऋण कधीही विसरणार नाही. मात्र, आम्ही पक्षात आयात केले नेते नाही.'

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 14, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading