कल्याण, 20 जून : गर्दीने खचाखच भरलेल्या कल्याण स्टेशनवर एका मद्यधुंद आरपीएफ जवानाने महिलेची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. तिथे लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या जवानाला बेदम चोप दिला. कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर हा आरपीएफ जवान महिलेशी छेडछाड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 18 तारखेचा हा व्हिडिओ असल्याचं कळतंय. दारू पिऊन हा पोलीस जवान शेजारी बसलेल्या महिलेशी छेडछाड करत असल्याचं समोरच बसलेल्या व्यक्तीनं मोबाईलवर शूट केलं. त्यानंतर जेव्हा शेजारच्या व्यक्तीला ही गोष्ट लक्षात आली त्याला पकडून लोकांनी चोप दिला आणि आरपीएफकडे तक्रार केली. त्यानंतर सदर पोलिसाला निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.