JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुख्यमंत्रीपद मिळालं, परंतू आता खरी अग्निपरीक्षा; शिंदे गटात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू

मुख्यमंत्रीपद मिळालं, परंतू आता खरी अग्निपरीक्षा; शिंदे गटात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू

हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही – उद्धव ठाकरे

जाहिरात

गुवाहाटीवरून निघण्याआधी एकनाथ शिंदे हे कामाख्या देवीच्या दर्शनाला आमदारांसह पोहोचले.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जुलै : शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता संपलं असं नाही. तर अर्धी लढाई अद्यापही बाकी आहे. शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या 40 हून अधिक आमदारांची मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना फोडून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता आमदारांच्या अपेक्षाही वाढल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. आतापर्यंत बच्चू कडू यांच्याजवळ राज्यमंत्रिपद होतं. मात्र आता कॅबिनेट मंत्रिपद मिळावं आणि मोठा विभागा असावा अशी मागणी केल्याची चर्चा आहे. जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास यांसारखी मोठं मंत्रिपद त्यांना मिळावं अशी बच्चू कडूंची मागणी आहे. दुसरीकडे शिंदेंच्या गटातील संजय शिरसाटही नाराज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला आहे. एका जिल्ह्यात दोन मंत्रिपद दिलं जात असल्यानं शिरसाट नाराज झाले आहे. यापुढेही अशी नाराजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेची खरी अग्निपरीक्षा आता सुरू होत आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही – उद्धव ठाकरे राज्यात एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची (Eknath Shinde Chief Minister) शपथ घेतल्याच्या एक दिवसानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्रकारांशी (Former Chief Minister Uddhav Thackeray PC) संवाद साधला. यादरम्यान त्यांनी भूतकाळातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.  उद्धव ठाकरे म्हणाले की, जर गृहमंत्री अमित शाहांनी मला दिलेलं वचन पूर्ण केलं असतं तर आज राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता. मात्र हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही. पुढे ते म्हणाले की, 2019 मध्ये युतीदरम्यान मी अमित शहा यांना म्हणालो हो, की, अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असेल. जर त्यांनी हे मान्य केलं असतं तर आघाडी सरकारसोबत युती करावी लागली नसती. आणि आता अडीच वर्षांनंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या