मुंबई, 17 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची (Maharashtra corona case) संख्या वाढत असल्यामुळे कडक निर्बंध (Lockdown) लागू करण्यात आले आहे. पण, दुसरीकडे कोरोनाबाधित (corona patient) रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पार गेली आहे. तर 419 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हॉस्पिटल्स रुग्णांमुळे तुडुंब भरलेली आहे. रुग्णांना लवकर बेड उपलब्ध होत नाहीये तर दुसरीकडे रेमेडीसीवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज वाढली आहे. आज राज्यात 67,123 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 419 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात मोठी संख्या आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59% एवढा आहे. Coronavirus in Pune: पुण्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ तर गेल्या 24 तासांमध्ये 56,783 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 30,61,174 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.18 वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,35,80,913 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,70,707 (15.99 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,72,584 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 25,623 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर राज्यात सध्या 6,47,933 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत गाड्यांना मिळणार कलर कोड! मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पण, तरीही रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याचे नाव नाही. त्यामुळे आता मुंबईतील रस्त्यावर फिरणे आता आणखी कठीण होणार आहे. कारण, पोलिसांकडून गाड्यांना वेगवेगळ्या रंगाचे कोड देण्यात येणार आहे. बेडच मिळेना, हॉस्पिटलसमोरच महिला दिवसभर रुग्णवाहिकेतच! दौंडचा विदारक VIDEO यापुढे आता मुंबईत खाजगी वाहनांवर 3 प्रकारचे कलर कोड लागणार आहे. कलम 144 नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गांड्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. यापुढे अत्यावश्यक वाहनांवर पिवळ्या रंगाचा कोड असणार आहे. तर मेडिकल सेवा वाहनांवर लाल रंगाचा कोड असणार आहे. जीवानावश्यक सेवेतील भाज्यांचा वाहनांवर हिरव्या रंगाचे कोड असणार आहे. WhatsAppवर युजर्स होत आहेत आपोआप बॅन, जाणून घ्या कारण तिन्ही रंगाचे कोड हे मुंबई पोलीस आणि स्थानिक पोलीस देणार आहे. जर या कलर कोडचा दुरुपयोग केल्यास कलम 419 नुसार कारवाई केली जाणार आहे.