JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai local सुरू करताना दिलेल्या सूचनेची मुख्यमंत्र्यांनी पुन्हा करून दिली आठवण

Mumbai local सुरू करताना दिलेल्या सूचनेची मुख्यमंत्र्यांनी पुन्हा करून दिली आठवण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उद्योजकांना गर्दी टाळण्याचं आवाहन करताना मुंबई लोकल (Mumbai Local) सुरू करताना दिलेल्या सूचनेची आठवण करून दिली आहे.

जाहिरात

स्थानकांवरील पासच्या समस्येसाठी ऑफलाइन प्रणाली 11 ऑगस्ट 2021 पासून दररोज सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कार्यान्वित होईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 एप्रिल: राज्यभरात कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पाऊलं उचलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच 5 एप्रिल रोजी सरकारने नवी नियमावली जाहीर करत राज्यभरात मिनी लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उद्योजकांना गर्दी टाळण्याचं आवाहन करताना मुंबई लोकल (Mumbai Local) सुरू करताना दिलेल्या सूचनेची आठवण करून दिली आहे. ‘बँका, खासगी कार्यालये यांनी वेळांची विभागणी करून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे. वर्क फ्रॉम होम कार्यपद्धती अवलंबावी. मुंबई लोकल सुरू करतानाही ‘पिक’ हा शब्द काढून टाका असं सांगितलं होते. पिक अवर ऐवजी, चोवीस तास का नको? चोवीस तासांच्या विभागणीत काम करून गर्दी आणि विविध यंत्रणांवरील ताण टाळणे शक्य आहे. शिस्त पाळून काम करा. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची जबाबदारी घ्या. त्यांच्या खाण्याची आणि येण्या-जाण्याची व्यवस्था यासाठी नियोजन करा. यासाठी चांगली एसओपी तयार करून ती सादर करण्यात यावी,’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत दिले. ‘लॉकडाऊन सरकारने नाही तर कोरोनाने केला आहे’ ‘कोरोनाचे संकटच मोठे आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला आहे. याची पूर्वकल्पना मी वारंवार देत आलो आहे. कोरोना वाढू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्याच लागतील असे सांगितले होते. त्यामुळे हा लॉकडाऊन सरकारने नाही केला. तर कोरोनाने केला आहे. हे लक्षात घ्या,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या निर्णयावर व्यक्त करण्यात येत असलेल्या नाराजीवर भाष्य केलं आहे. हेही वाचा - सुप्रीम कोर्टात धक्का की दिलासा? अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज सुनावणी ‘लॉकडाऊनचा परिणाम सगळ्यांवरच म्हणजे विकास कामांवर, लोकांच्या रोजीरोटीवर होतो याची जाणीव आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर संपवायची आहे. पण मध्यंतरी आपण बेफिकीर झालो. त्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आता उभ्या केलेल्या सुविधा अपुऱ्या पडतील, ऑक्सीजनचा तुटवडा होईल अशी भीती आहे. रुग्णसंख्या वाढ रोखण्याठीच हे असे निर्बंध आणावे लागले आहेत,’ असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या