JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / शिवसेनेची दुटप्पी भूमिका, मोपलवारांवरून सरकारवर टीका

शिवसेनेची दुटप्पी भूमिका, मोपलवारांवरून सरकारवर टीका

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर शिवसेनेचा दिव्याखाली अंधार असल्याचं दिसून आलंय. वादग्रस्त राधेश्याम मोपलवारांच्या निमित्तानं शिवसेनेनं सामनातून सरकारला खडे बोल सुनावलेत. पण हे करताना शिवसेनेला स्वत:कडेच एमएसआरडीसी खातं असल्याचा विसर पडलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 आॅगस्ट : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर शिवसेनेचा दिव्याखाली अंधार असल्याचं दिसून आलंय. वादग्रस्त राधेश्याम मोपलवारांच्या निमित्तानं शिवसेनेनं सामनातून सरकारला खडे बोल सुनावलेत. पण हे करताना शिवसेनेला स्वत:कडेच एमएसआरडीसी खातं असल्याचा विसर पडलाय. भाजपच्या पारदर्शक कारभाराचा सध्या फज्जा उडाल्याची टीका शिवसेनेनं सामनातून केलीय. मोपलवार भ्रष्ट आहेत तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांना हटवण्याची मागणी का केली नाही, हा प्रश्न आहे. पालिकेतले पारदर्शकतेचे पहारेकरी झोपलेले आहेत असं या संपादकीयातून म्हणण्यात आलंय. खडसेंवर आरोप झाल्यावर ते गेले, पण मेहतांना मात्र कवचकुंडले आहेत! हा दुटप्पीपणा असल्याचं म्हणण्यात आलंय. भविष्यात आणखी मोपलवार निर्माण होणार नाहीत याची काळजीही मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असा सल्लाही या संपादकीयातून देण्यात आलाय. काय म्हटलंय ‘सामना’मध्ये? भारतीय जनता पक्षाच्या पारदर्शक वगैरे कारभाराचा सध्या भलताच फज्जा उडालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले एक अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची पारदर्शक ध्वनिफीत कारभाराची वाट दाखवत आहे. राज्याच्या रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले राधेश्याम ही साधी असामी नाही. मुख्यमंत्र्यांना हव्याच असलेल्या समृद्धी महामार्गाची संपूर्ण जबाबदारी या राधेश्यामांच्या खांद्यावर आहे आणि जोरजबरदस्तीनं शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात हे साहेब आघाडीवर आहेत. त्यामुळे मंत्रालयात दहा कोटी पोहोचवण्याचा पारदर्शक कारभार करणारे मोपलवार नक्की कुणासाठी हा व्यवहार करीत होते व आतापर्यंत त्यांनी अशा किती खेपा पोहोचवल्या, त्याचा तपास मुख्यमंत्र्यांनी करायलाच हवा. आता या मोपलवारांना मुख्यमंत्र्यांनी पदच्युत केले ते ठीक आहे, पण भविष्यात आणखी मोपलवार निर्माण होणार नाहीत याची काळजीही त्यांनी घ्यायला हवी. कारण मेहतांसारखे जे मंत्री आहेत त्यांच्या हाताखाली अनेक मोपलवार काम करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या