मुंबई, 19 फेब्रुवारी : एकीकडे राज्यातील सरकार पेट्रोल व डिजेल वाढीवरुन केंद्र सरकारवर टीका करीत असताना विरोधी पक्षानेही शिवसेनेवर पुन्हा तोफ डागली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर करीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये एक शेतकरी स्वत:च्या शेतातील ऊस जाळत आहे. अपेक्षित हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना म्हटले की, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्या शिवसेनेचे मंत्री शेतकर्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण.
हे ही वाचा- राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याच्या भावाकडून 11 कोटींचं दान शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्यांनी जगायचेच नाही. मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रताप चालविलाय्, नेवास्यात शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे. किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका !, असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.