10 एप्रिल : राजधानी दिल्लीत आज एनडीएच्या 32 घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे ‘मातोश्री’ची परंपरा खंडित होणार आहे. कारण राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास पाहिला तर शिवसेनेचं समर्थन मागण्यासाठी आतापर्यंत सर्व पक्ष ‘मातोश्री’वर यायचे, पण शिवसेना पहिल्यांदाच राष्ट्रपती निवडणुकीबाबत दिल्लीत चर्चा करणार आहे. दिल्लीतील प्रवासी भारतीय भवन इथे आज संध्याकाळी साडे सहा वाजता ही बैठक होणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या मोठ्या विजयानिमित्त ही बैठक आयोजित केल्याचं म्हटलं जात असलं चर्चा राष्ट्रपती निवडणुकीचीच होणार आहे. मोदींच्या शपथविधीनंतर म्हणजे जवळपास मे 2014नंतर 3 वर्षांनी उद्धव ठाकरे हे मोदी-शहांना असे दिल्लीत भेटतील. याआधी दोनवेळा उद्धव ठाकरे हे दिल्लीत येऊन गेले, मात्र तेव्हा ते राजनाथ सिंह, जेटली यांनाच भेटले.