JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'गुजरातचा माणूस पंतप्रधान होऊ शकतो, मग तुम्हीही...' शरद पवारांसमोरच अमोल कोल्हेंनी केली विनंती

'गुजरातचा माणूस पंतप्रधान होऊ शकतो, मग तुम्हीही...' शरद पवारांसमोरच अमोल कोल्हेंनी केली विनंती

‘ज्या दिवशी शरद पवार पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतील तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदचा असेल’

जाहिरात

'ज्या दिवशी शरद पवार पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतील तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदचा असेल'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar birthday) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचा (ncp) मेळावा मुंबईत सुरू आहे. यावेळी पुन्हा एकदा शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे असा सूर उमटला आहे. खासदार अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी ‘शरद पवार यांनी देशाचे नेतृत्त्व करावे जर गुजरातमध्ये 26 खासदार असताना पंतप्रधानपदी व्यक्ती विराजमान होऊ शकते मग 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातून शरद पवार सुद्धा विराजमान होऊ शकतात’ अशी विनंतीच केली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज मुंबईत नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना अमोल कोल्हे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळत देशाचे नेतृत्व करावे अशी मागणीच केली. आता काळाची गरज आहे, देशात परिस्थितीत कुरक्षेत्रात झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षात महाराष्ट्र आणि देश कसा असावा याचा विचार करावा लागणार आहे. यासाठी सेनापती म्हणून शरद पवार आज आपल्यासोबत आहे. त्यांच्या विचारांना घेऊन आपल्याला पुढे लढावे लागणार आहे. असं म्हणत, शरद पवार यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी विनंतीच अमोल कोल्हे यांनी केली. IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित टेन्शनमध्ये, विराटच मिळवून देणार विजय आज देशभरात जातीपातीचे राजकारण सुरू आहे. धार्मिक उन्माद उफाळून आला आहे. प्रत्येक समाजामध्ये टोकाच्या भूमिका निर्माण झाल्या आहे. त्यामुळे देशाला पवार साहेबांच्या नेतृत्त्वाची गरज आहे. जर 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते तर महाराष्ट्रात 48 खासदार असलेल्या पक्षाची व्यक्ती शिवरायांचा मावळा या सर्वोच्चपदी विराजमान होऊ शकते, अशी भावनाच कोल्हे यांनी व्यक्त केली. ‘ज्या दिवशी शरद पवार पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतील तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदचा असेल. संसद भवनातला शिवरायांचा पुतळा सुद्धा याबद्दल समाधान व्यक्त करेल, असंही अमोल कोल्हे म्हणाले. कधी कुली तर कधी कंडक्टर, ‘थलायवा’ पर्यंतचा रजनीकांत यांचा कठीण प्रवास ‘आम्हाला अभिमान वाटतोय, आमच्या नेत्याला पाच लाखांचा सूट घालावा लागत नाही. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जान आहे. आमच्या नेत्याला हजारो-लाखो  रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही. आमच्या नेत्याच्या खिश्याला महागडा पेन लागत नाही. तर साधा पेनने आमचा नेता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सही करतो, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टोला लगावला. जेव्हा आपण मॅरेथॉन स्पर्धा पाहतो तेव्हा एक स्पर्धक हा जिंकल्यानंतर आनंद साजरा करतो. पण, असा एक स्पर्धक असतो जो जिंकल्यानंतर आनंद तर साजरा करतो पण पुढची स्पर्धा जिंकण्यासाठी पुढे धाव घेतो असं कर्तृत्व शरद पवार यांचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या राजकारण्यांनी ठसा उमटवला, त्यापैकी शरद पवार हे गेल्या 40 वर्षांपासून दिल्लीत आपली ओळख तयार करून आहे, अशी स्तुतीसुमनंही अमोल कोल्हे यांनी उधळली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या