JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / या नेत्यांनी आणला भाजप-शिवसेनेत दुरावा; संजय राऊतांनी सांगितलं BJP सोबतचं 25 वर्षांचं नातं

या नेत्यांनी आणला भाजप-शिवसेनेत दुरावा; संजय राऊतांनी सांगितलं BJP सोबतचं 25 वर्षांचं नातं

राणे यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले की, भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेविरोधात अशी हिंसक भाषा कधीही वापरली नाही. 2019 मध्ये वेगळे होण्यापूर्वी दोन्ही पक्ष 25 वर्षे एकत्र होते.

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची सुटका झाल्यानंतर राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut on Narayan Rane) यांनी भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या ‘नवीन चेहऱ्यांनी’ दोन्ही पक्षांमधील संबंध बिघडवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेना (Shivsena and BJP) यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद होते, पण संबंध कधीही बिघडले नाहीत. राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्दाबाबत बोलतना म्हटलं, की दोन्ही पक्ष 25 वर्षे एकत्र होते. रायगडमधील एका कार्यक्रमादरम्यान राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानशिलात मारण्याबाबत बोलल्यानंतर तणाव वाढला. राणे यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले की, भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेविरोधात अशी हिंसक भाषा कधीही वापरली नाही. 2019 मध्ये वेगळे होण्यापूर्वी दोन्ही पक्ष 25 वर्षे एकत्र होते. “भाजप आणि शिवसेनेचे काही मुद्द्यांवर वेगवेगळे विचार होते, पण आमचे संबंध कधीच बिघडले नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या नवीन नेत्यांनी संबंध बिघडवले आहेत,” असं राऊत म्हणाले. “राज्य आणि केंद्राच्या संघर्षांत माझा बळी;पक्षप्रमुखांविरोधात बोलल्याने टार्गेट” राऊत यांनी नव्या नेत्यांची तुलना बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांशी केली. ते म्हणाले, “ते बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांसारखे कुख्यात आहेत जे आमचे सामाजिक सौहार्द बिघडवतात.” आम्ही कधीही एकमेकांवर हल्ला केला नाही किंवा संबंध बिघडवले नाहीत. नारायण राणे ज्या पद्धतीने वागत आहेत, ते शत्रुत्व दाखवत आहेत. राऊत म्हणाले, “आम्हाला माहिती आहे की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे अटलजी आणि अडवाणीजींशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधही सौहार्दपूर्ण आहेत. शिवसेनेतून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करणारे राणे 1999 मध्ये भाजप-शिवसेनेच्या सरकारदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. मात्र, जुलै 2005 मध्ये शिवसेनेने त्यांची “पक्षविरोधी कारवाया” केल्यामुळे हकालपट्टी केली. आनंदाची बातमी! कोरोना लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम राऊत यांचे वक्तव्य आल्यानंतर थोड्याच वेळात केंद्रीय मंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची पोलखोल करण्याची धमकीही दिली. राणे म्हणाले की, त्यांनी शिवसेनेसोबत अनेक दशके काम केले आहे आणि त्यांना पक्षाबद्दल बरेच काही माहिती आहे. ते म्हणाले, ‘मी त्यांच्यासोबत 39 वर्षे काम केले आहे. मला अनेक गोष्टी माहिती आहेत. मला माहीत आहे की कोणी स्वतःच्या भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकण्यास सांगितलं. हे संस्कार कसे आहेत?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या