गेलेल्या 40 गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले
मुंबई, 22 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या 23 जानेवारी जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी जाहिरात देऊन ‘साहेब मी गद्दार नाही’ असं म्हणत गद्दारांना गाडण्याची प्रतिज्ञा केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून संजय राऊत नेहमी अग्रलेख आणि रोखठोक सदरातून भाजप आणि शिंदे गटावर टीका करत असतात. पण, आज संजय राऊत यांनी जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
सामनाच्या पहिल्या पानावर अर्धपान जाहिरात दिली आहे. ‘साहेब मी गद्दार नाही, गेलेल्या 40 गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल, जय महाराष्ट्र!’ असा मजकूर या जाहिरातीवर देण्यात आला आहे. ( खरी शिवसेना कुणाची? मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले ) या जाहिरातीत फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि खाली शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांचा उल्लेख आहे. (शरद पवारांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नेत्याचे निधन, पार्थिव हॉस्पिटलला करणार दान) बाळासाहेबांची उद्या जयंती आहे, पण शिवसेनेची सध्या प्रचंड वाताहत झाली आहे. पक्षचिन्ह आणि नाव गोठवले गेले आहे. पक्षचिन्ह धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल पुढील महिन्यात लागणार आहे. अनेक आमदार आणि खासदार हे पक्ष सोडून गेले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीचा काळ हा शिवसेनेसाठी आव्हानात्मक असणार आहे, अशा या वातावरणात जाहिरातीच्या माध्यमातून शिवसैनिकांना साद दिली आहे.