JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / समीर भुजबळ सव्वा दोन वर्षांनी तुरुंगाबाहेर

समीर भुजबळ सव्वा दोन वर्षांनी तुरुंगाबाहेर

मुंबई, 07 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ अखेर सव्वा दोन वर्षांनी कारागृहाबाहेर आले. आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. बुधवारी मुंबई हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. 5 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र सोडून जाता येणार नाही आणि सुनावणीवेळी कोर्टात हजर राहावं लागेल या अटीवर कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झालाय. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि कंत्राटांच्या बदल्यात काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपाखाली समीर भुजबळ अटकेत होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ अखेर सव्वा दोन वर्षांनी कारागृहाबाहेर आले. आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. बुधवारी मुंबई हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. 5 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र सोडून जाता येणार नाही आणि सुनावणीवेळी कोर्टात हजर राहावं लागेल या अटीवर कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झालाय. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि कंत्राटांच्या बदल्यात काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपाखाली समीर भुजबळ अटकेत होते. ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) या कायद्यातील कलम ४५विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा लाभ समीर यांना मिळू शकत नाही, असं म्हणत सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मंगळवारी समीर यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या