मुंबई, 12 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) फैलाव वाढत आहे. त्यातही मुंबईत सर्वाधित कोरोना पॉझिटिव्ह (Covid - 19) रुग्णांची संख्या आहे. मुख्य म्हणजे कोरोना हा मुंबईतील झोपडपट्टी भागात शिरल्याने सरकारची चिंता वाढली आहे. अशा दाटीवाटीच्या भागात राहत असल्याने येथे कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असणारं सोशल डिस्टन्सिंग कसं पाळता येईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपाय सुचविला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबईतील (Mumbai Slum) झोपडपट्टी भागात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या कमी करण्याची एक पर्याय सुचविला आहे. कारण कोरोनाला रोखणं हे आपलं प्रथम कर्तव्य असलं तरी मुंबईतील लोकसंख्या, दाटीवाटीने राहणारे लोक, झोपडपट्टी यासर्व आव्हानांनुसार अॅक्शन घेणं आवश्यक आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अधिक संख्येने लोक राहता. लोक दाटीवाटीने राहत असल्याने त्यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवता येत नाही. परिणामी कोरोनाचा फैलाव होण्याची भीती असते. त्यामुळे काही लोकांची मेडिकल कॅम्पप्रमाणे मोठ्या मैदानांवर तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय करता येईल का, याबाबत विचार व्हावा. त्यामुळे यावर पालिकेकडून या उपाययोजनेवर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. संबंधित - लॉकडाऊनमध्ये पोलिसाने केलेल्या मारहाणीत आलं अंधत्व, तरुणाकडून न्यायाची मागणी भावाच्या मृत्यूनंतर डगमगली नाही, अंत्यसंस्कारानंतर कोरोनाच्या लढ्यात झाली तैनात संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे