विवेक कुलकर्णी, मुंबई, १५ ऑक्टोबर : ‘गुजराती माणसं फार हुशार असतात,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. ते ‘उद्योजक मी होणारच’ या चर्चासत्रात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी तरुणांनी उद्योजक होण्यासाठी काय करायला हवं, याबाबत आपलं मत मांडलं. मुंबईतील या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी हेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. उद्योगांबाबत मार्गदर्शन करतानाच त्यांनी मोदींना टोला लगावला. राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
‘उद्योजक व्हा’ असे इतर कोणत्याही समाजात सेमिनार होत नाहीत त्यांच्याकडे फक्त उद्योजकच होतात.
नामदार गोखलेंनी महात्मा गांधींना भारत भ्रमण करण्याचा सल्ला दिला होता, ना मी नामदार गोखले ना तुम्ही महात्मा गांधी पण तुम्ही इतर राज्यं जरा फिरून पाहा, तिथल्या लोकांना तिकडे काही नाही म्हणून इकडे यावं लागतंय. आपलं राज्य पवित्रच आहे ते अधिक पवित्र करा.
पुस्तक वाचून धंदा करू नका, त्यानं काहीच होत नाही.लोक म्हणतात मराठी माणूस वडापाव विकतो, अहो पण तो धंदा आहे. बाहेरच्या राज्यात माणसं धंदा कसा करतात ते पाहा, तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही अत्यंत चांगल्या राज्यात राहता.
मनोहर जोशी म्हणतात की तुम्ही ताजमहल हाॅटेल बांधा. खरं तर त्यांनीच ते बांधायला हवं होतं.
गुजराती माणूस गुजराती माणसाला कामावर का ठेवत नाही, कारण त्याला भीती असते की तो शिकून धंदा करेल.
सुसंकृत मराठी माणसानं पोषक वातावरण केलं म्हणून मारवाडी आणि गुजराती माणसं इथं येऊन धंदा करू शकला. त्यांनी त्यांच्या राज्यात धंदा का सुरू केला नाही तो त्यामुळेच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.