JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई लोकलमध्ये विद्यार्थीनीसोबत घडला विचित्र प्रकार; भामट्याने ओठ आणि नाक चावत केलं रक्तबंबाळ, मग...

मुंबई लोकलमध्ये विद्यार्थीनीसोबत घडला विचित्र प्रकार; भामट्याने ओठ आणि नाक चावत केलं रक्तबंबाळ, मग...

त्या व्यक्तीने तिला धावत्या ट्रेनमधून ढकलण्याचा प्रयत्न केला आणि तिचे ओठ आणि नाक चावलं. रक्तस्त्राव आणि वेदना झेलत असतानाही तिने लढा दिला आणि अखेर स्वतःची सुटका केली

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 08 जून : लोकल ट्रेनच्या लेडीज कोचमध्ये एका 35 वर्षीय भामट्याने 20 वर्षीय तरुणीची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न करत तिला क्रूरपणे मारहाण केली (Ragpicker Brutally Assaults a Girl in Mumbai Local). तरुणीने मिड-डेसोबत बोलताना सांगितलं की त्या व्यक्तीने तिला धावत्या ट्रेनमधून ढकलण्याचा प्रयत्न केला आणि तिचे ओठ आणि नाक चावलं. रक्तस्त्राव आणि वेदना झेलत असतानाही तिने लढा दिला आणि अखेर स्वतःची सुटका केली. यादरम्यान एका महिलेनं साखळी ओढली आणि ट्रेन थांबताच या भामट्याने उडी मारली. यानंतर पुढच्या डब्यातील लोक उतरले आणि पाठलाग करून त्याला पकडून चर्चगेट जीआरपीच्या ताब्यात दिलं. दक्षिण मुंबईतील 20 वर्षीय विद्यार्थीनी चर्चगेटसाठी सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजता प्रभादेवी स्थानकावरुन लोकलमध्ये चढली. ती महिलांच्या डब्यात तीन सहप्रवाशांसह प्रवास करत होती. ती खिडकीजवळ बसलेली असताना चर्नी रोड स्टेशनवर एक व्यक्ती लोकलमध्ये चढला आणि तिच्या समोर बसला. गेमसाठी अल्पवयीन मुलाने गोळ्या झाडून केली आईची हत्या; 3 दिवस मृतदेहाजवळ बसून केलं हे काम गोरेगावचा रहिवासी पप्पू गुप्ता काही वेळातच समोरून उठला आणि तरुणीच्या बाजूला येऊन बसला. हा व्यक्ती तिची बॅग पकडू लागताच घाबरलेली तरुणी जागेवरुन उठली आणि दरवाजाजवळ उभा राहाण्यासाठी गेली. यानंतर हा व्यक्ती तिला म्हणाला, ‘बैठो, बैठो… कहा जा राही हो?’ तरीही तरुणी आपल्या जागेवरुन उठली आणि दरवाजाजवळ असलेल्या महिला सहप्रवाशाजवळ उभी राहिली. गुप्ता तिच्या मागे गेला आणि तिथेही तिच्या जवळ उभा राहिली. घाबरलेली महिला सहप्रवाशी आणि इतर दोघे इथून पळ काढू लागले. यानंतर गुप्ता या विद्यार्थीनीला ट्रेनमधून ढकलण्याचा प्रयत्न करु लागला, पण यात अपयशी ठरला. त्यानंतर त्याने तरुणीचे केस ओढायला सुरुवात केली.. या झटापटीत विद्यार्थीनी खाली कोसळली. यानंतर गुप्ता तिच्या अंगावर बसून तिचं नाक आणि ओठ चावू लागला. प्रचंड रक्तस्त्राव आणि वेदना सहन करत या तरुणीने आरोपीचं डोकं पकडून दरवाजाजवळ असलेल्या लोखंडी रॉडवर आदळलं. हा सगळा प्रकार पाहून एका महिला सहप्रवाशाने ट्रेनची चेन खेचली. बारामतीतल्या कुप्रसिद्ध गुंड्याचा गुन्हेगारी हैदोस, मुलाचे अपहरण करुन दिली जीवे मारण्याची धमकी, नंतर महिलेसोबत केलं विकृत कृत्य ट्रेन थांबताच गुप्ताने तरुणीची बॅग आणि मोबाईल फोन घेऊन ट्रेनमधून उडी घेतली. मात्र पुढच्या डब्यातील प्रवाशांनी तरुणी मदतीसाठी ओरडत असल्याचं ऐकून ट्रेनमधून उडी मारली आणि त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र रुळावर धावत असतानाच गुप्ताने आपल्या मागे धावणाऱ्या लोकांवर दगड फेकण्यास सुरुवात केली. अखेर प्रवाशांनी गुप्ता याला पकडलं आणि चर्चगेट जीआरपीच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याला मारहाण केली. पोलिसांनी त्याच्यावर आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा क्रूर लैंगिक अत्याचार असल्याचं महिलेनं ठामपणे सांगितलं. तर वरिष्ठ निरीक्षक विजय तायडे म्हणाले, “पुरुषाच्या कृत्यामागील हेतू महत्त्वाचा आहे. हे फक्त महिलेला लुटण्यासाठी होतं आणि आम्ही तिचा जबाब नोंदवला आहे."

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या