मुंबई, 6 एप्रिल : ‘अक्षर हे कसे मोत्यासारखे असावे’ असं आपण नेहमी ऐकत असतो. कॅलिग्राफी किंवा सुलेखन ही कला आहे आणि ती कुठल्याही वयात आत्मसात करता येते. म्हणून ‘न्यूज18 लोकमत डिजिटल’ने अक्षरमंत्र - ‘असं काढा अक्षर सुंदर’ ही विशेष मालिका आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केली आहे. या मालिकेमध्ये सुलेखनकार राम कस्तुरे अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन धडे देणार आहेत. अक्षरमंत्रचा आजचा हा पहिला भाग…