JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Political News : अजितदादांनी इच्छा बोलून दाखवली अन् जयंत पाटलांनी व्यासपीठावरच दिलं उत्तर, म्हणाले...

Political News : अजितदादांनी इच्छा बोलून दाखवली अन् जयंत पाटलांनी व्यासपीठावरच दिलं उत्तर, म्हणाले...

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावरचा पक्ष आहे. शरद पवार यांच्या ध्येयधोरणामुळे हा पक्ष उभा आहे. पक्षाचा बूथवरचा आग्रह अजितदादांनी सांगितला’

जाहिरात

(जयंत पाटील आणि अजित पवार)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा बोलून दाखवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अजितदादांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या स्टाईलमध्ये ‘दादांनी माझे महिने मोजले आहे’ अशी प्रतिक्रिया देऊन दादांना टोला लगावला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नाही. मला या जबाबदारीतून मुक्त करा, अशी जाहीर मागणीच केली. त्यानंतर जयंत पाटील भाषणाला उभे राहिले, अपेक्षेप्रमाणे पाटलांनी आपल्या शैलीत दादांना सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावरचा पक्ष आहे. शरद पवार यांच्या ध्येयधोरणामुळे हा पक्ष उभा आहे. पक्षाचा बूथवरचा आग्रह अजितदादांनी सांगितला आहे. मी 5 वर्ष 1 महिना अध्यक्ष झालो आहे. अजितदादांनी माझे महिने मोजले आहे. मी 5 वर्ष एक महिना महाराष्ट्रात काय सांगतोय, बूथ कमिटी बांधा. आपण किती भाषण केली, पण ग्राऊंडवर जर आपली फिल्डिंग नसेल तर काही होणार नाही. ज्या ठिकाणी आपण निवडून आलो तिथे आपल्या बुथ कमिट्या जास्त होते. जिथे नव्हत्या तिथे आपल्या जागा कमी आल्या आहे, अशी वास्तववादी परिस्थितीच जयंत पाटलांनी मांडली. (विरोधी पक्षनेते पदात इंटरेस्ट नाही, मला जबाबदारीतून मुक्त करा अन्.. अजितदादांच्या मागणीने खळबळ) ‘दादा तुमच्याकडे कोणता कार्यकर्ता जर काम घेऊन आला तर दादा त्याला विचारा तू कोणत्या बूथ मधला आहे. तुझं गाव आणि काम काय हे जर झालं तर सगळेच काम करायला लागतील. आता इथून गेल्यावर आपल्याला बूथ निर्माण करण्यासाठी काम करायचे आहे हे लक्षात घ्यावं, असा सल्लाही जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला. ‘विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी योग करण्यासाठी गेलं पाहिजे होतं. कारण तिथे सत्ताधारी लोक किती वाकतात हे त्यांना पाहता आलं असतं. विरोधी पक्षनेत्याचं हे काम आहे’ असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला. (  ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत मोठी कपात; एस्कॉर्ट व्हॅनसह ‘मातोश्री’वरील सुरक्षाही कमी ) ‘खरं म्हणजे, निवडणुका कधी होणार हे कुणालाच माहिती नाही. जिथे भाजप कमकुवत आहे, अशा ठिकाणी दंगली होत आहे. आता महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे काम होत आहे, आता पर्यंत कुणाला अटक झाली, याची गृहमंत्र्यांनी माहिती घेतली पाहिजे. पण असं होत नाही. निवडणुका सरकार घेत नाही. त्यामुळे असं वाटतंय दिवाळी झाल्यानंतरच निवडणुका होतील’ असंही जयंत पाटील म्हणाले. ‘आज पाणीपुरवठा योजनेत 2004, 7 आणि 8 मध्ये प्रचंड काम केलं. पण आता केंद्राकडून पैसा मिळतो. त्यामुळे अजितदादांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभेत बाजू मांडवी किती घोटाळे आणि गैरव्यवहार आहे, याची माहिती समोर येईल, असंही जयंत पाटील म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या