मुंबई, 30 नोव्हेंबर: राज्यातील शाळा उद्या सुरू होणार असल्यातरी मुंबईतील शाळांबाबत (School Reopen)संभ्रम होता. त्यातच मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) शाळा सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आताच समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेकडून उद्यापासून शाळा सुरु होणार नाही आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून 1 तारखेपासून शाळा सुरू होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु होणार नाही आहेत. मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उद्यापासून नाहीतर 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. मुंबई पालिकेनं ही माहिती दिली आहे. हेही वाचा- मुलाला चावल्याचा आला राग, डॉक्टर बापानं कुत्र्याचे केले छोटे-छोटे तुकडे कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे उद्या शाळा सुरू होणार की नाही ? शिक्षक आणि पालकांसमोर प्रश्नचिन्ह उभा होता. शाळा सुरु करण्याबाबत पालिकेची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेणार नाहीत. राज्यात उद्यापासून शाळा सुरु सोमवारी राज्य सरकारनं अध्यादेश काढून 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करणारच असल्याचं स्पष्ट केलं आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभागाकडून अध्यादेश काढण्यात आला आहे. पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा 1 डिसेंबरला सुरू होणार आहे. एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावे आणि एका बाकावर एकच विद्यार्थी असावा, अशी सूचना देण्यात आली आहे. हेही वाचा- मेरे पास माँ है! नौदल प्रमुखांचा हा Video पाहून सर्वच होतील Emotinal तसंच,ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाणार आहे. विद्यार्थींनी शाळेत असताना मास्क व्यवस्थित घालण्याबाबत नियमावलीत विशेष सूचना करण्यात आली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण झालेले असणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी अशी आहे नियमावली -एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत - एका बाकावर एकच विद्यार्थी असावा - दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे - शिक्षकांची सोय त्याच गावात त्याच शहरात राहण्याची करावी - गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या आवारात येऊ देऊ नये - वर्ग आळीपाळीने म्हणजे काही वर्ग सकाळी तर काही वर्ग दुपारी असे करावे - विद्यार्थींनी शाळेत असताना मास्क व्यवस्थित घालण्याबाबत नियमावलीत विशेष सूचना - शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले असणे बंधनकारक - विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी - स्कूल बसचा वाहन चालक, मदतनीस यांचेही लसीकरण पूर्ण झाले असणे बंधनकारक - बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसाने घ्यावी - सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शाळा भरणार - ३ ते ४ तासच शाळा भरणार - मैदानी खेळ किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी - विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक - घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच थांबवावे - जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार - पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर द्यावा