Mumbai band : पालघरमध्ये आंदोलक आक्रमक, संपूर्ण शहर पाडलं बंद !

पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर शहरात सध्या बंदला सुरुवात झालीये.

पालघर, 25 जुलै : पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर शहरात सध्या बंदला सुरुवात झालीये. बोईसर पूर्ण पणे बंद केलं असून येथे रिक्षा आणि एसटी बस सेवाही बंद करण्यात आली आहे. सध्या फक्त ग्रामीण भागातील लोकल एसटी वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर लांब पल्ल्याचा बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच बाजारपेठ आणि रिक्षा सेवाही बंद आहेत. वाडा शहर सुरु आहे. मात्र येथील बस वाहतूक फक्त सुरक्षेच्या कारणास्तव कुडुसपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सीपीएमने पाठिंबा दिला असला तरी डहाणू, तलासरी, वाडा, जव्हार, मोखाडा सुरळीत सुरु आहे.Mumbai Band: नवी मुंबईत ऐरोली ते वाशी बेस्ट बस सेवा पूर्णपणे बंदतर दुसरीकडे ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मोर्चेकरांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. या सगळ्या अंदाज घेत पोलिसांचा मोठा ताफा जागोजागी तैनात केला आहे. पण मोर्चेकरांच्या गर्दीने ठाणे पूर्व मार्ग पूर्णपणे जाम झाला आहे.

नवी मुंबई येथील घणसोली येथे आज पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंतची बेस्ट सेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे- वाशी रेल्वेने प्रवास करणं सोयीस्कर ठरणार आहे. नवी मुंबईतील अनेक शाळा कॉलेजमधील मुलांना कोणतीही पूर्व कल्पना न देता घरी पाठवण्यात आले. या सगळ्या गदारोळात सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.हेही वाचा...Mumbai band : ठाण्यात मराठा आंदोलक उतरले रस्त्यावर, पूर्व भागात मोठी वाहतूक कोंडीभिवंडी 3 मजली इमारतीचा भाग कोसळला, 5 बचावले पण 1 महिलेचा मृत्यूलोकलच्या दारात पदर अडकला,जीव थोडक्यात वाचला

Trending Now