JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO: 'कॅन्सरशी लढत होते मी, पण...' भावुक होत गुवाहाटीतून सेना आमदारानं मांडली घुसमट

VIDEO: 'कॅन्सरशी लढत होते मी, पण...' भावुक होत गुवाहाटीतून सेना आमदारानं मांडली घुसमट

शिवसेनेच्या मुंबईतील आमदार यामिनी जाधव (Yamini Jadahav) यांनी थेट गुवाहाटीमधून व्हिडीओतून प्रसिद्ध करत आपली घुसमट व्यक्त केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत (Eknath Shinde) जाणाऱ्या आमदारांची कारणं आता उघड होत आहे. मुख्यंंत्र्यांनी आपल्या भावना कधीही समजून घेतल्या नाहीत, असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी जाहीर पत्रातून केला होता. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या मुंबईतील आमदार यामिनी जाधव (Yamini Jadahav) यांनी थेट गुवाहाटीमधून  व्हिडीओतून प्रसिद्ध करत आपली घुसमट व्यक्त केली आहे. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. हे जग सुद्धा आम्ही शिवसैनिक म्हणुन सोडणार.यशवंत जाधव ४२ वर्षे शिवसैनिक आहेत. वयाच्या १७ वर्षांपासून शिवसैनिक आहेत. त्यांनी पक्षाबाबतीत कधी वेगळा विचार केला नाही. गेल्या काही महिन्यात माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. मला कॅन्सर झाला होता. पक्षाला याबाबत माहिती दिली.महिला आमदार म्हणुन माझ्या घरी काही नेते येतील, माझी विचारपूस करतील असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. फक्त किशोरी पेडणेकर आल्या. एकाही शिवसेना नेत्याने मला विचारले नाही. माझी मरानासन्न अवस्था झाली असती तर मला नेते बघायला आले असते, असं जाधव यांनी भावुक होत सांगितले.

संबंधित बातम्या

अनेक  दिवसापासून मन घुसमट होतं कोणाचा आधार नव्हतं, मार्गदर्शन नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेतला. हा निर्णय घेतला म्हणजे शिवसेना सोडली नाही. आम्ही असं का केलं याचं कारण शोधण्याची गरज आहे, असा सल्ला जाधव यांनी पक्षाला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या