JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / #Mumbai26/11 : कसाबला फासापर्यंत नेणारं Mission X 'या' महिला अधिकाऱ्यानं केलं पूर्ण

#Mumbai26/11 : कसाबला फासापर्यंत नेणारं Mission X 'या' महिला अधिकाऱ्यानं केलं पूर्ण

अजमल कसाबला पकडल्यानंतर फासावर लटकवण्यापर्यंतचा प्रवासही सोपा नव्हता. कसाबचा अंत पाहिलेल्या आणि ते मिशन X यशस्वी करणाऱ्या राज्याच्या कारागृह विभागाच्या तत्कालीन प्रमुख मीरां चड्ढा बोरवणकर यांनी न्यूज18 लोकमतबरोबर शेअर केलं त्या मोहिमेचं सिक्रेट.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, २१ नोव्हेंबर : “त्यानं आपल्या देशाच्या निरागस नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्या दहशतवाद्याशी सामना करताना महाराष्ट्र पोलिस विभागातले धडाडीचे अधिकारी आणि कर्मचारीही शहीद झाले होते. त्या अजमल कसाबला त्याच्या अंतिम प्रवासापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. 26/11च्या प्रकरणाचा शेवट आम्ही केला…. मिशन एक्स अत्यंत गुप्तपणे पार पडलं. या मिशनमधलं मोठं आव्हान होतं ते सिक्रेट ठेवण्याचं…” माजी IPS अधिकारी मीरां चड्ढा बोरवरणकर सांगत होत्या. राज्याच्या कारागृह विभागाच्या तत्कालीन प्रमुख मीरां चड्ढा बोरवणकर यांनी 26/11चा हल्लेखोर अजमल कसाबला फासावर लटकवणाऱ्या मिशन एक्स मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या मोहिमेचं सिक्रेट त्यांच्याच तोंडून ऐका…. डोकं सुन्न करणाऱ्या या मोहिमेत गुप्तता हेच मोठं आव्हान होतं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या