मुंबई, 20 जून: तुम्हाला जर नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करायची सवय असेल तर जरा इकडे लक्ष द्या. कारण यापुढे आता तुमच्या गाडीला 10 हजार रुपयांचा दंड बसू शकतो. मुंबई महानगरपालिका येत्या 7 जुलैपासून पार्किंगबाबत नवा नियम लागू करणार आहे. मुंबईत गाडी पार्क कुठेही करण्याच्या बाबीमुळे ट्रॅफिक जॅम होत असल्याचं पालिकेच्या लक्षात आल्यानं आता पालिका यावर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे.