JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत आणि काँग्रेस नेत्याची झाली बैठक

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत आणि काँग्रेस नेत्याची झाली बैठक

शिवसेना खासदार संजय राऊत आणि गोवा काँग्रेसचे नेते दिगंबर कामत यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली

जाहिरात

शिवसेना खासदार संजय राऊत आणि गोवा काँग्रेसचे नेते दिगंबर कामत यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोवा, 03 जानेवारी : गोवा विधानसभा निवडणुकीचे (goa assembly election 2022) वारे वाहू लागले आहे.  भाजपने (bjp) एकीकडे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून (shivsena) आता गोव्यात महाविकास आघाडीचा (mva government) प्रयोग करण्याची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी गोव्यातील काँग्रेसचे नेते दिगंबर कामत (digambar kamat) यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेंना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शिवसेना खासदार संजय राऊत आणि गोवा काँग्रेसचे नेते दिगंबर कामत यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.  महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. गोवा विधानसभा निवडणूक याच वर्षी होणार आहेत. या निवडणूकीत शिवसेना आणि काँग्रेस आघाडी करून निवडणूक लढण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. गोवा विधानसभेसाठी उत्तर गोवामधील मराठी बहूल अशा 7 विधान सभा मतदारसंघामधील जागासाठी शिवसेना आग्रही असल्याचीही माहिती मिळत आहे. ( ‘स्वामिनी’ फेम अभिनेत्रीनं चिमुकलीचा फोटो शेअर करत दिली GOOD NEWS ) वराज्यात विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनीच महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी शिवसेनेच्या बाजूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. संजय राऊत यांनी भाजपला अंगावर घेत पुन्हा जुळवून घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत एकत्र येत शिवसेनेनं महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आता पुन्हा एकदा गोव्यासाठी संजय राऊत मैदानात उतरले आहे. ( तिच्यासाठी कायपण! GF साठी BF ने असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला ) विशेष म्हणजे, राष्ट्रवादीकडून सुद्धा गोव्यात पक्ष मजबूत करण्यावर कल आहे. अलीकडे दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यावेळी गोव्यासह विविध राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पावले उचलावी, याबाबत चर्चा झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या