JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आधी मिंध्याचे नेते हे बाळासाहेब होते आता...., शिंदेंच्या भाषणाचं उद्धव ठाकरेंकडून पोस्टमॉर्टेम

आधी मिंध्याचे नेते हे बाळासाहेब होते आता...., शिंदेंच्या भाषणाचं उद्धव ठाकरेंकडून पोस्टमॉर्टेम

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये मिंधे असले तरी भाजपचेच सरकार आहे. दोन्ही नेत्याचे एकच नेते आहे.

जाहिरात

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये मिंधे असले तरी भाजपचेच सरकार आहे. दोन्ही नेत्याचे एकच नेते आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जालना, 11 डिसेंबर :  ‘महाराष्ट्रामध्ये मिंधे असले तरी भाजपचेच सरकार आहे. दोन्ही नेत्याचे एकच नेते आहे. आपल्या मिंध्याचे नेते एकेकाळी बाळासाहेब होते, आता कोण मोदी आहे. बोम्मईंचा नेता मोदी आहे मग ते इतक्या जोरात बोलताय, मग हे गप्प का? असा सवाल थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ठाण्यातील आंबेडकर चळवळीतले अॅड. दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आज ठाण्यातील युवांचा मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनाभवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. एका बाजूला महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद पेटला आहे. पण महाराष्ट्राच्या बाजूने कुणीच बोलणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीत आणि माज आल्यासारखे बोलत आहे. पण आमचे मुख्यमंत्री हे स्क्रिप्ट लिहून दिल्यासारखे वाचत आहे. कोर्टात याचिका दाखल केलेली असताना तसं त्यांनी बोललं पाहिजे. त्यांना सोलापूर पाहिजे, अक्कलकोट पाहिजे, इतकी हिंमत होती कशी. केंद्रात भाजपचे सरकार आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये मिंधे असले तरी भाजपचेच सरकार आहे. दोन्ही नेत्याचे एकच नेते आहे. आपल्या मिंध्याचे नेते एकेकाळी बाळासाहेब होते, आता कोण मोदी आहे. बोम्मईंचा नेता मोदी आहे मग ते इतक्या जोरात बोलताय, मग हे गप्प का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. (PM Modi In Nagpur : ‘हे डबल इंजिन सरकार…’ पंतप्रधान मोदींनी थोपाटली शिंदे-फडणवीसांची पाठ) ‘केंद्रात आणि कर्नाटक राज्यात भाजप सरकार होते आणि राज्यात मिंदे सरकार आहे मग का होत नाही. पंतप्रधान या बाबातीत काही बोलणार आहेत की नाही. समृद्धी महामार्ग याचे आधीच उद्घाटन होणार होते मात्र पुल पडला आता तो पडला की पाडला हे माहीत नाही, असा संशयही ठाकरेंनी व्यक्त केला. काही जणांना वाटतं शिवसेना संपली अशी वाटतं मात्र काही जण शिवसेना स्वतःला समजत होते. ते आता संपले आहे. महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात हा मोर्चा आहे. महाराष्ट्राची अवहेलना होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा माणूस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला बसला, त्यामुळे महाराष्ट्राने नेमकं समजायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला. ( ‘समृद्धी’चं उद्घाटन करणार होतो पण.., अजितदादांनी बोलून दाखवली खंत ) त्यावेळी महामार्ग तयार झाला होता सव्वा दोनशे किलोमीटर आहे. आज त्याचं उद्घाटन झालं. त्यांचं बरंच काही म्हणणं आहे. निर्भय पथकातील गाड्या शिंदे गटातील मंत्र्यांना रक्षणासाठी वापरात असतील तर यांना काय म्हणावं, अशी टीकाही ठाकरेंनी केली. गेले दोन चार महिने रोज कोणाचा ना कोणाचा प्रवेश शिवसेनेत होतो आहे. एका जिद्दीने सर्व पेटलेले आहेत आता मी सत्तेत पण नाही तरी सुद्धा तुम्ही येत आहात. सत्तानारायण एक भाग आणि सत्तानारायण दुसरा भाग आहे. काही जणांना सत्तानारायण पावतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या