मुंबई, 29 ऑक्टोबर : एसटी महामंडळातर्फे दुष्काळसदृश तालुक्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास मोफत देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. आज मुंबईत आयोजित न्यूज18 लोकमतच्या ‘रायझिंग महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याचंही रावते म्हणाले आहे. तर एसटी महामंडळात अनेक रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेतून कामं आम्ही काम केली. आम्ही लोकांच्या कामासाठी प्रसंगी विरोधकांचीही मदत घेतली. मी माझ्या खात्यातून रोजगार निर्माण कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले. रोजगार सर्वांना पाहिजे म्हणून रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने मुक्त केले. तर गेल्या वर्षभरात 1.50 लाख रिक्षाचालकांना परवाने वाटले, असं दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. तर आम्ही माओवादीग्रस्त भागात वेगळं काम केलं. 100 माओवादी पोलिसांपुढे शरण आले. त्यांच्यासाठी कोणतीही सोई सुविधा नाही असं रावते म्हणाले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान शहीद होत असतो ही दु:खाची बाब आहे. शहिदांच्या वारसांना आम्ही नोकरी दिली. त्यांना एसटीत मोफत प्रवास उपलब्ध करून दिल्याचंही रावते म्हणाले. दरम्यान, 18 नेटवर्कची ‘रायझिंग महाराष्ट्र 2018 समिट ’ आज (29 आॅक्टोबर)ला पार पडतोय. यात राज्यातले महत्त्वाचे नेते, मान्यवर, वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात भविष्यातील महाराष्ट्राच्या रोडमॅपवर चर्चा करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या समिटमध्ये विशेष उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल त्यांच्या योजना आणि दृष्टिकोन ते आपल्या भाषणातून मांडतील. मंत्रिमंडळातले वरिष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुभाष देसाई यांच्यासह धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाई जगताप यांच्यासारखे विरोधी पक्षांचे नेते या परिषदेत भाग घेणार आहेत. आयटीसी ग्रँड सेंट्र्ल, परेलमध्ये ही समिट पार पडत आहे. न्यूज18 नेटवर्कच्या ‘रायझिंग’ मालिकेतल्या या समिटला आतापर्यंत अनेक राज्यांत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तिथे त्या-त्या राज्यांचा रोडमॅप निश्चित करण्यासाठी संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि धोरणकर्त्यांनी सखोल चर्चा केली. आता ही समिट महाराष्ट्रात होणार आहे. आणि मान्यवरांच्या सहभागानं ती निश्चितच पुढचा टप्पा गाठेल. VIDEO: झाकणात अडकलेल्या सगळ्यात विषारी सापाला ‘असं’ केलं मुक्त