JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे संजय राऊत क्लिन बोल्ड, म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे संजय राऊत क्लिन बोल्ड, म्हणाले...

‘तेव्हाचे देवेंद्र फडणवीस आणि आताचे फडणवीस यांच्यामध्ये खूप फरक दिसून येत आहे. त्यांना आता स्टंटबाजी करण्याचा काय गरज आहे, कळत नाही.

जाहिरात

'तेव्हाचे देवेंद्र फडणवीस आणि आताचे फडणवीस यांच्यामध्ये खूप फरक दिसून येत आहे. त्यांना आता स्टंटबाजी करण्याचा काय गरज आहे, कळत नाही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी : फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायचा छंद आहे. फडणवीस आधी असे नव्हते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचीच ऑफर दिली होती. आज उपमुख्यमंत्री आहात, किती दिवस राहतील बघू, असा टोला खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

‘तेव्हाचे देवेंद्र फडणवीस आणि आताचे फडणवीस यांच्यामध्ये खूप फरक दिसून येत आहे. त्यांना आता स्टंटबाजी करण्याचा काय गरज आहे, कळत नाही. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा देऊन जात होते, त्यावेळी विरोधी पक्षांसोबत बोलले असतील. पण, इतक्या दिवसांनी ते बोलून सनसनाटी निर्माण करण्याची गरज काय होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती ना. आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, आता किती काळ उपमुख्यमंत्री राहाल हे सांगता येत नाही, शेवटी दिल्लीची मर्जी आहे. ठीक आहे, इन्जॉय करा, असं राऊत म्हणाले. (…तो प्रकल्प लातूरला गेला कसा? धनंजय मुंडेंचा पंकजा आणि प्रीतम मुंडेंना सवाल) ‘पोलीस पोलिटिकल एजंट बनून पैसे वाटतात. हे पुराव्यासह उघड झालं आहे. बारामती, माढामध्ये पैसे वाटले आहे. पोलिसांच्या गाड्यांमधून 5 वर्षांपूर्वी अनेकांनी उघड केले आहे. त्यामुळे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आरोप केला आहे. त्यांच्याकडे पक्की माहिती असणार आहे, असंही राऊत म्हणाले. (  औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटणार? एमआयएमचं सरकारला थेट आव्हान ) सरकारच्या मनात निवडणुकीला सामोरं जायचं भय आहे. हे लोकशाहीचे लक्षण नाही. ज्या निर्लज्जपणा आमदारांना खासदारांना विकत घेत आहे. तीच निर्भयता निकाल घेण्यासाठी का दाखवत नाही. सरकार पाडण्यात निर्लज्जपणा आणि बेडरपणा दाखवतात तो बेडरपणा निवडणुका घ्यायला दाखवा, अशी टीकाही राऊत यांनी केली. 2024ची तयारी आम्ही सुरु केली आहे. केजरीवाल आणि मुख्यमंत्री मान यासोबत काही भूमिकांवर चर्चा झाली. राष्ट्रीय पातळीवर ठोस काही तरी करण्यासाठी चर्चा झाली आहे. दिल्लीत बहुमत असतानाही निवडणूक घेऊ दिली नाही. केजरीवाल हे लढव्यया नेते आहे. आपलाही कोर्टात जाऊन न्याय मिळवावा लागतो, त्यामुळे बिहार असो किंवा दिल्लीचे असो, आम्ही संघर्ष करून पुढे जात आहोत, असंही राऊत म्हणाले. संभाजीनगर आणी धाराशिव नामकरण घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी 25 वर्षांपूर्वी केली होती. आता फक्त घोषणा झाली आहे. ज्यांना मोर्चा काढायचा त्यांना काढू द्या, असंही राऊत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या