JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Devendra Fadnavis मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Devendra Fadnavis मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Devendra Fadnavis and Raj Thackeray meeting: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी दाखल झाले आहेत.

जाहिरात

देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला (Photo: Twitter video grab)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज ठाकरेंचे नव्या घरी देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होत असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे हे आपल्या नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांमधली बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. ही एक कौटुंबिक भेट असल्याचं बोललं जात आहे. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट बोलता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. राज ठाकरेंच्या घरी दाखल होताच देवेंद्र फडणवीस हे घराच्या गॅलरीत येऊन माध्यमांसमोर फोटोसाठी एक पोजही दिली. गेल्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. तसेच राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनही करत आहेत. सध्या राज्यात सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप यावरही अद्याप तोडगा निघालेला नाहीये आणि एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेटही घेतली होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. वाचा : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल? नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट  दिवाळी पाडव्याच्या दिवशी भाजप नेते आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या घरी आले होते. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील मैत्रीबद्दल सर्वांनाच माहित आहे. दरवर्षी आशिष शेलार राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर येत असतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी आशिष शेलार सकाळीच कृष्णकुंजवर पोहोचले. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये भेट झाली. दिवाळी फराळ घेत दोघांनीही गप्पा मारल्याची माहिती समोर आली होती. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना या भेटीदरम्यान एक पुस्तकही भेट दिलं होतं. यासोबतच भाजप नेते प्रसाद लाड यांनीही नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. येत्या काळात महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका लक्षात घेता आता देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या