मुंबई, 17 मे : गेल्या 3 दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) अरबी समुद्रात थैमान घातले आहे. आज सकाळी मुंबईपासून (Mumbai)170 किमी अंतरावरून चक्रीवादळ गुजरातकडे (Gujrat) निघाले आहे. याचा परिणाम मुंबईवर झाला असून पावसाने हजेरी लावली. मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या मार्गावर झाड कोसळल्याची घटना घडली. तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सकाळपासून जाणवू लागला आहे. सकाळी हलक्या स्वरूपात पडत असलेला पाऊस 9 वाजेनंतर जोरदार बरसत आहे. तर वारा ही जोरात वाहत आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या मार्गावर झाड कोसळल्याने रेल्वेची ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
पालिकेच्या वतीने हे जाड काढण्याचं काम सुरू झालेला आहे तर पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने च्या घटना घडल्या आहे. दरम्यान, मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे मध्य रेल्वेनं हायअलर्ट जारी केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. सर्व गाड्यांना अलर्ट राहण्याची सूचना देण्यात आली आहे. अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. कोरोना रुग्णांना कशी वाचवशील? या उत्तरामुळं तरुणी झाली Miss Universe उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. VIDEO : 6 महिन्यांनंतर उघडली केदारनाथ धामची कवाडं; 11 क्विंटल फुलांनी सजलं मंदिर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.