हे सरकार आता कोसळणार, तेव्हा कोसणार अशी डेडलाईन वारंवार विरोधकांकडून दिली जात असते, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार...
मुंबई, 21 जानेवारी : राज्यात महाविकास आघाडी सरकारला खाली खेचून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल. पण, हे सरकार आता कोसळणार, तेव्हा कोसणार अशी डेडलाईन वारंवार विरोधकांकडून दिली जात असते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही तर फेब्रुवारीमध्ये सरकार कोसळणार असं भाकीत वर्तवलं आहे. पण, आता सरकारने काउंटडाऊन सुरू झाले आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या ना त्या मुद्यावरून अमोल मिटकरी हे शिंदे सरकारवर एकदाही टीकेची संधी सोडत नाही. आता त्यांनी ट्वीट करून आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.
‘सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की’ असं मिटकरी म्हणाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर होणार का, अशी चर्चा रंगली आहे. (बीडमध्ये पंकजा मुंडे नाराज अन् मुंबईत फडणवीस धनंजय मुंडेंच्या भेटीला, चर्चांना उधाण) विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.20) शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय बंगल्यावर भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटी मागचं कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या दोघांच्या झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. ( मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेआधी धक्कादायक प्रकार, एकाला अटक ) दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मंत्रिमंडळ विस्तार की शिवसेनेतील धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेला वाद यामध्ये काय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. आमच्याकडे बहुमताचा आकडा - बावनकुळे दरम्यान, ठाकरे गटाकडून शिंदे गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण घटनापीठाकडे आहे. मात्र या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तरी आम्ही बहुमत सिद्ध करू, असं सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे. आमच्याकडे बहुमताचा आकडा हा 184 इतका आहे, असा दावाही बावनकुळे यांनी केली.