JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...आणि छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना केली 'ही' विनंती

...आणि छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना केली 'ही' विनंती

Chhagan Bhujbal on OBC Political Reservation: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात छगन भुजबळ यांनी भाष्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती केली आहे.

जाहिरात

यावेळी इम्पेरिकल डेटाच्या मागणीवरून फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कोर्टात चेंडू टोलावला तर भुजबळ यांनी...

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तुषार रूपनवर, प्रतिनिधी मुंबई, 24 जून: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने (BJP) सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच दरम्यान आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक विनंती केली आहे. फडणवीसांनी श्रेय घ्यावं पण… देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच संपूर्ण श्रेय घ्यावं पण ओबीसी आरक्षणाचा डाटा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, ही माझी विनंती आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. 5 वर्ष भाजपा सरकारच्या हातात ओबीसी विषय होता मात्र काहीही तुम्ही केलं नाही. भाजपा सरकारने डाटा मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र केंद्र सरकारने डाटा दिला नाही आणि आता तुम्ही म्हणताय 4 महिन्यांत करता अस म्हणत भुजबळांनी फडणवीसांना टोलाही लगावला. “तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो”: देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या नेत्रृत्वात पंतप्रधानांना भेटायला तयार छगन भुजबळ यांनी पुढे म्हटलं, आम्ही स्वत: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज, उदया कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओबीसी आरक्षणाच्या डाटा संदर्भात भेटायला जायला तयार आहोत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना सांगितल तुम्ही नेतृत्व करा, तुमच्या नेतृत्वात आम्ही पंतप्रधान मोदींना भेटायला येतो. तुम्ही आंदोलन करत आहात मी स्वागत करतो. “मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे”, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका अजित पवारांची चौकशी? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात आला. त्यानंतर तो मंजुरही करण्यात आला. यावर छगन भुजबळ म्हणाले, भाजपाच्या बैठकीत ठराव पास करण्यात आला आहे अजित पवार यांच्या चौकशी संदर्भातला. मात्र त्याच भाजपाने अजित पवार यांच्या सोबत सरकार स्थापन केलं होतं. आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत. शरद पवार यांच्या पाठीशी देखील ईडी लावली होती मात्र आमच्या पक्षाचे कोणतेही नुकसान झाले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या