मुंबई, 10 एप्रिल : कोरोनामुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 96 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत जगातील सर्व देशांमध्ये जवळजवळ लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्र सरकारने भारतात अडकलेल्या 230 ब्रिटिश नागरिकांना मायदेशी पाठवण्याची तयारी केली आहे. आज ब्रिटनमध्ये अडकलेल्या 230 नागरिकांसाठी मुंबईहून चार्टर प्लेन रात्री रवाना झाले. फक्त मुंबईतून नाहीतर आता गोव्यात अडकलेल्या पर्यटकांसाठीही 14 ते 15 एप्रिल दरम्यान सोय करण्यात आली आहे. ब्रिटिश नागरिक सुखरूप मायदेशी रवाना झाल्यानंतर तेथील सरकारने ट्वीट करत ठाकरे सरकारचे आभार मानले. वाचा- ‘ती’ लेकराला पाहू शकत नाही,देवासारखे धावून आलेल्या डॉक्टरांना कराल सॅल्युट
वाचा- मोठी बातमी, लॉकडाउन किती वाढणार? उद्धव ठाकरे मांडणार मोदींकडे ‘हा’ प्रस्ताव
वाचा- पसरत होता कोरोना, तरी वुहान सोडून परतला नाही भारतीय; कारण वाचून कराल सलाम ब्रिटनमधून पर्यटनासाठी आलेले बरेच नागिरक होते. त्यांच्या सुटकेसाठी ब्रिटिश सरकारने भारताकडे मदत मागितली होती. कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर सर्व परदेशी नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. आता त्यांची वैद्यकीय चाचणीकरून त्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले आहे.
वाचा- कोरोनामध्ये होऊ शकतात दहशतवादी हल्ले, संयुक्त राष्ट्र संघटनेने दिला इशारा ब्रिटनमध्येही कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 65 हजार 077 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 7 हजार 978 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये ठेवले होते, मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.