मुंबई, 3 जुलै : महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिला पेपर तर सोडवला आहे. रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Maharashtra Assembly Speaker) पार पडली, त्यात शिंदे गटाचे भाजप उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विजयी झाले. सोमवारी बहुमत चाचणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपली ताकद सिद्ध करायची आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांमध्ये चार नावं आघाडीवर.. आघाडीमधील तीन्ही पक्षांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेता त्यांचाच असणार आहे. राष्ट्रवादीमध्ये या पदासाठी 4 नावावर जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे या नावांचा समावेश आहे. दरम्यान, अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज अजित पवार यांच्या नावावर होणार शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बैठकीत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Assembly Speaker Election : शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शीरगणती करण्यात आली . शिंदे आणि भाजपच्या बाजूने बसलेल्या आमदारांची संख्या ही बहुमताचा आकडा पार केला. राहुल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं मिळाली त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर मविआचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात 107 मतं मिळाली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. आधी ते शिवसेनेत होते, आता भाजपमध्ये आहेत, त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही होते. त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे. पक्षाची हीच भूमिका प्रवक्ते म्हणून मांडताना त्यांनी वेळोवेळी आपल्यातील हे गुण दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.