मुंबई, 14 जुलै: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानावर हल्ला करणारा आरोपी अजून ही मोकाट फिरत आहे. धक्कादायक म्हणजे, हा आरोपी दादर ते ठाणे चालत गेल्याची माहिती माटुंगा पोलिसांना मिळाली. राजगृहावर तोडफोड करणारा हल्लेखोर ठाण्यातील तीन हात नाका येथील चौकातून तो चालत जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा हल्लेखोर पुढे भिवंडीच्या दिशेने गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दृष्टीने तपास करत आहे.
सीसीटीव्हीमध्ये राजगृह हल्ला प्रकरणातील आरोपी तीन हात नाका चौकातून चालत जाताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांना या आरोपीचा मागोवा मिळाला असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील अशा विश्वास माटुंगा पोलिसांनी व्यक्त केला आहे. एका आरोपीला आधीच झाली अटक दरम्यान, 09 जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इथल्या निवास स्थानी 7 जुलैला हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परेल टीटी भागात हा आरोपी राहणारा असून याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. अधिक तपास केला असता सीसीटीव्ही आणि साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर संशयित आरोपीच मुख्य आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालं. राजस्थानमधील राजकीय नाट्याला नवे वळण, सचिन पायलट यांच्या नव्या मागणीने खळबळ पोलिसांनी उमेश जाधव याला अटक केली आहे. उमेश जाधव हा प्रेस भागात राहणारा 35 वर्षांचा तरुण आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हे कृत्य का केलं याबाबत पोलिसांनी अजून खुलासा केला नाही तर मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. राजगृह हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे या निवासस्थानाला विशेष महत्त्व आहे.