JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO: ठाकरेंवर टीका करणारे बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात; 7 गाड्यांची धडक

VIDEO: ठाकरेंवर टीका करणारे बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात; 7 गाड्यांची धडक

या घटनेबद्दल स्वतः भारत गोगावले यांनी न्यूज १८ लोकमतशी बातचीत केली. आपण मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने जात होतो, अशी माहिती त्यांनी दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 11 जुलै : एकनाथ शिंदे गटाचे महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात झाला आहे (Bharat Gogawale Accident). मुंबईमधील ईस्टर्न फ्री-वेवर सात गाड्यांची धडक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

संबंधित बातम्या

या घटनेबद्दल स्वतः भारत गोगावले यांनी न्यूज १८ लोकमतशी बातचीत केली. आपण मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने जात होतो, अशी माहिती त्यांनी दिली. घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एकामागोमाग ७ गाड्यांची धडक झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘…तेव्हा लाज वाटली नव्हती का?’, शिंदे गटाकडून ठाकरेंवर पहिल्यांदाच टोकाची टीका, भरत गोगावले आक्रमक दरम्यान, शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी रविवारी प्रचंड तिखट शब्दांमध्ये ठाकरे गटातील आमदार आणि मुख्य शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला होता. “2019 साली शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजप एकत्र सत्ता स्थापन करावी, अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?”, असा सवाल शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला होता. “आम्ही बाळासाहेबांचा हिंदूत्ववादी विचार लोकभावनेचा आदर करत सेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आम्हाला ना त्याची लाज बाळगण्याची गरज आहे, ना राजीनामा देण्याची”, असेही त्यांनी ठणकावून सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या