मुंबई 21 जून : विधान परिषद निवडणूक (MLC Election Result) निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशात आता मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे 29 आमदार फुटलेले आहेत. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार फुटलेले आहेत. यात ठाकरे सरकारचे तीन मंत्रीही नॉट रिचेबल आहेत.