JOIN US
मराठी बातम्या / मनी / डेबिट कार्डशिवाय करा ऑनलाईन पेमेंट, अवघ्या काही सेकंदात होईल काम

डेबिट कार्डशिवाय करा ऑनलाईन पेमेंट, अवघ्या काही सेकंदात होईल काम

आतापर्यंत UPI सेवेचा लाभ घेण्यासाठी, युजर्सना वैध डेबिट कार्ड क्रमांक प्रविष्ट करणं अनिवार्य होतं. OTP प्रमाणीकरणासाठी डेबिट कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर या आधारावर UPI सुरू होतं. पण PhonePe वर तुम्ही तुम्हाला आधारवरून UPI सुरू करू देते.

जाहिरात

डेबिट कार्डशिवाय करा ऑनलाईन पेमेंट, अवघ्या काही सेकंदात होईल काम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 नोव्हेंबर: फिनटेक कंपनी फोनपेने आधार बेस्ड UPI सेवा सुरू केली आहे. या नवीन सेवेत UPI ला आधारशी लिंक करून व्यवहार करता येणार आहेत. या नवीन सुविधेत, आधारच्या मदतीने ओटीपी प्रमाणीकरण केलं जाते आणि व्यवहार पूर्ण केला जातो. ही सेवा UPI अॅपवर डेबिट कार्ड क्रमांक टाकण्यासारखीच आहे. आतापर्यंत, UPI सेवेचा लाभ घेण्यासाठी, वापरकर्त्याला वैध डेबिट कार्ड क्रमांक प्रविष्ट करणं आवश्यक होतं. OTP प्रमाणीकरणासाठी डेबिट कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर या आधारावर UPI सुरू होतं. पण PhonePe तुम्हाला आधारवरून UPI ​​सुरू करण्याची परवानगी देतं. अनेक बँक खाती एका आधारशी जोडलेली असतात, ज्याचा फायदा UPI मध्ये उपलब्ध आहे. PhonePe नं म्हटलं आहे की आधार बेस्ड ऑथेंटिकेशनमुळं प्रमाणीकरणामुळे डेबिट कार्डच बंधन काढून टाकलं जाईल. जर कोणतंही खातं आधारशी लिंक केलं असेल तर या नवीन सेवेचा लाभ घेता येईल. UPI सह, आधार क्रमांक टाकावा लागतो डेबिट कार्ड क्रमांक नाही. त्याचा फायदा दूरवरच्या भागात राहणाऱ्या लोकांना होणार आहे. जिथे बँकेच्या शाखाही कमी किंवा दूर आहेत. अशा लोकांना आधारसह डिजिटल व्यवहाराचा लाभ घेता येणार आहे. हेही वाचा:  गुडन्यूज! शून्य मिनिटांत काढा लाईफ सर्टिफिकेट, त्यासाठी काय करायचं? वाचा PhonePe च्या या नवीन सुविधेमध्ये UPI शी आधार लिंक करता येणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी वापरकर्त्याला त्याचा आधार क्रमांक UPI अॅपमध्ये टाकावा लागेल. यानंतर, UIDAI कडून फोनवर एक OTP प्राप्त होईल. आधारशी लिंक असलेल्या बँकेकडून OTP देखील येईल, जो पडताळणीसाठी प्रविष्ट करावा लागेल. पडताळणीनंतर फोन पे पेमेंटची सेवा सुरू होईल.

यादरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आधारवरून UPI ​​चालवण्यासाठी वापरकर्त्याचा मोबाईल नंबर त्याच्या आधारशी लिंक केलेला असावा. यासोबतच आधार क्रमांकही बँक खात्याशी लिंक केलेला असावा. RBI, NPCI आणि UIDAI ने हे पाऊल उचललं आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना UPI चा लाभ मिळावा. बहुतेक लोकांकडे आधार क्रमांक असतो, जो फोन पेशी जोडला जाऊ शकतो आणि त्यामाध्यमातून डिजिटल व्यवहार करू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या