लोन अॅप्लीकेशन
मुंबई, 26 जानेवारी: अनेकदा जेव्हा पैशाची नितांत गरज असते तेव्हा कर्ज हाच एकमेव आधार राहतो. परंतु अनेकदा सर्व औपचारिकता पूर्ण करूनही तुमचे लोन अॅप्लीकेशन बँकेकडून नाकारले जाते. गेल्या काही दिवसांपासून, रीटेल लोनची मागणी खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत बँकेकडून कर्जासाठीच्या अर्जाची बारकाईने तपासणी केली जाते. जर तुमचाही अर्त वारंवार रिजेक्ट होत असेल तर याचे कारण आपण आज जाणून घेणार आहोत.
जेव्हा जेव्हा एखादी बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) तुमच्या कर्जाचा अर्ज रिजेक्ट करते. तेव्हा तुम्हाला याचे कारण माहिती असणे आवश्यक असते. ही कारणे खूप कमी लोकांना माहिती असतात. कमी उत्पन्न, कमी क्रेडिट स्कोर, वेळेवर EMI न भरणे किंवा एकाच ठिकाणी टिकून नोकरी न करणे. तसेच, तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये चूक झाली असली तरी, तुमचा कर्ज अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
अशी करा पैशांची बचत, स्वतःला लावून घ्या या 5 सवयीकर्ज घेण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा, कारण त्याचा सर्वाधिक परिणाम होतो. कर्जासाठी 750 ते 900 पर्यंतचा क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. जर तुमचा स्कोअर यापेक्षा कमी असेल, तर कर्जासाठी अर्ज करणे थांबवा आणि वारंवार चौकशी करू नका. यानंतर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. कमी सिबिल स्कोअरमुळे, तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. चांगल्या सिबिल स्कोअरसह, तुमच्यासाठी कर्ज मिळवणे सोपे आहे. तसेच, तुम्ही थकित EMI आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरली पाहिजेत.
तुम्हाला कर्जाची वेळेत परतफेड करण्यासाठी तुमच्याजवळ उत्पन्न स्रोत परमानेंट असणे गरजेचे आहे. काहीवेळा तुमची नोकरी वारंवार बदलणे हे देखील एक मोठे कारण असते. जे लोक खूप वेळा नोकरी बदलतात किंवा बराच काळ बेरोजगार असतात, त्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येतात. दुसरीकडे, जर तुम्ही 1 किंवा 2 वर्षांपेक्षा जास्त काळ कंपनीत असाल, तर तुमची कर्ज मंजूरी खूप लवकर होते.