तुमचे सॅलरी अकाउंट आहे? मग हे वाचाच
आणखी पाहा...!
सॅलरी अकाउंट हे सामान्य बँक अकाउंट प्रमाणे असते. ज्यात तुमचा पगार दरमहा जमा केला जातो.
तुमचे देखील सॅलरी अकाउंट असेल तर त्यासोबत मिळणाऱ्या फायद्यांविषयी देखील माहिती असली पाहिजे.
यामध्ये, बँका क्लासिक सॅलरी अकाउंट, वेल्थ सॅलरी अकाउंटची सुविधा देतात.
तसेच बँका बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट- सॅलरी आणि डिफेन्स सॅलरी अकाउंटची सुविधा देखील देतात.
वेल्थ सॅलरी अंतर्गत बँक तुम्हाला डेडिकेटेड वेल्थ मॅनेजर देतात. हा मॅनेजर तुमच्या बँकेशी संबंधित काम पाहतो.
काही बँका पेरोल अकाउंटला क्रेडिट कार्ड देणे, ओव्हरड्राफ्ट, स्वस्त लोन, चेक, पे ऑर्डर अशा सुविधा देतात.
तसेच डिमांड ड्राफ्टची फ्री रेमिटेंस, फ्री इंटरनेट ट्रान्झेक्शनची सुविधाही देतात.
तुमचा पगार नियमित सेविंग अकाउंटमध्ये जमा होत नसेल तर सर्व सुविधा परत घेतल्या जातात.
सॅलरी अकाउंटच्या बाबतीतही बँका एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खाते बदलण्याची प्रक्रिया सुलभ ठेवतात.
सॅलरी अकाउंट उघडण्यासाठी, तुम्ही कॉर्पोरेट संस्थेमध्ये काम करत असायला हवे.
तुमच्या कंपनीची त्या बँकेशी सॅलरी अकाउंट रिलेशनशिप असणे आवश्यक आहे.
यासोबतच ग्राहकाचे त्याच बँकेत दुसरे कोणतेही खाते नसावे.
बँक तुम्हाला प्रत्येक चेकवर तुमचे नाव छापलेले वैयक्तिक चेक बुक देते