मुंबई : तुळशीविवाहनंतर लग्नाची लगबग सुरू होते. या वर्षात मुहूर्तही कमी आहेत. त्यामुळे लग्नासाठी लोकांनी सगळ्या तारखा बुक केल्या आहेत. लग्नसराई म्हटलं की हातात जास्तीचे पैसे हवेतच कारण कधी कुठे कसा खर्च वाढेल याचा नेम नाही. लग्नासाठी नातेवाईक किंवा सावकाराकडून पैसे उधार घेण्यापेक्षा तुम्ही बँकेतून घेतलं तर? मुळात लग्नासाठी लोन मिळेल का? त्यासाठी कुठे अर्ज करायचा यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे सावकाराकडून पैसे उसने घेतले जातात. ते फेडताना पुरती ओढाताण होते. त्यामध्ये बऱ्याचदा फसवणूक होण्याचाही धोका असतो. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही लग्नासाठी सरळ बँकेत लोन घेऊ शकता. त्यासाठी कोणतं लोन मिळतं, किती व्याजदर असतं कोणत्या बँका लोन देतात याबाबत जाणून घेऊया.
तुम्हीही कुणाच्या लोनचे आहात गॅरेंटर? तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?लग्नासाठी तुम्ही बँकेतून लोन घेऊ शकता. HDFC, SBI, PNB या बँका खास ही सुविधा देतात. लग्नासाठी कोणतीही व्यक्ती 50,000 रुपयांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंत लोन घेऊ शकते. हे लोन फेडण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळही दिला जातो. त्यामुळे ते फेडण्याचं टेन्शनही राहात नाही. मात्र नियमित हप्ते भरणं महत्त्वाचं आहे. ते चुकवल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. लोन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 12 ते 60 महिन्यांचा अवधी दिला जातो. याशिवाय वयाच्या 21 व्या वर्षानंतर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता, जे फेडण्यासाठी तुम्हाला 5 वर्षांपर्यंतचं कर्ज देण्यात आलं आहे. तसेच हे कर्ज तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एका अटीसह लोनची सुविधा मिळू शकते. कर्ज घेण्यासाठी परस्पर मासिक उत्पन्न किमान 15,000 हजारापेक्षा जास्त असायला हवं.
लोन घेताना कोणती कागदपत्र लागतात? आताच चेकलिस्ट तयार कराहे लोन घेण्यासाठी तुमचा CIBIL Score 700 हून अधिक असायला हवा. जर तुमचा CIBIL Score खराब असेल तर तुम्हाला लोन मिळणार नाही. या लोनसाठी प्रोसेसिंग फी २.५० टक्के आहे. आता तुम्हाला जर बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही या लोनसाठी ऑनलाइन अर्जही करू शकता. तुम्हाला या अर्जासोबत तुमची सॅलरी स्लीप, KYC आणि फोटो द्यायचा आहे.